News Flash

रमेश कराड यांचा पुढाकार केज तालुक्यात माउली साखर कारखाना उभारणार

भाजप नेते रमेश कराड यांच्या पुढाकाराने केज तालुक्यातील देवगाव फाटा येथे ११७ कोटी खर्चून माउली शुगर हा साडेतीन हजार टन गाळप क्षमतेचा व १४ मेगावॉट

| January 8, 2014 01:41 am

रमेश कराड यांचा पुढाकार  केज तालुक्यात माउली साखर कारखाना उभारणार

भाजप नेते रमेश कराड यांच्या पुढाकाराने केज तालुक्यातील देवगाव फाटा येथे ११७ कोटी खर्चून माउली शुगर हा साडेतीन हजार टन गाळप क्षमतेचा व १४ मेगावॉट वीजनिर्मितीचा कारखाना जूनपासून उभारला जाणार आहे. भाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची उभारणी होणार आहे.
रेणापूर तालुक्यातील कारेपूर येथे आयोजित मेळाव्यात कराड यांनी ही माहिती दिली. माजी आमदार बब्रुवान खंदाडे, टी. पी. कांबळे, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, ओमप्रकाश गोडभरले, अॅड. सुरेंद्र घोडजकर आदी उपस्थित होते. परिसरातील ऊस उत्पादकांची गरसोय दूर करण्यासाठी नव्या कारखान्याची उभारणी केली जाणार आहे. येत्या जूनपासून प्रकल्पाला सुरुवात होईल. दवणगावचे सरपंच डॉ. बाबासाहेब घुले यांचा यशवंत पंचायतराज योजनेत दवणगावचा पहिला क्रमांक आल्याबद्दल या वेळी सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी कराड यांच्या उपस्थितीत या वेळी भाजपमध्ये प्रवेश घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2014 1:41 am

Web Title: mauli sugar factory in deogaon phata
Next Stories
1 रस्ते दुरुस्तीकडे पालिकेचे दुर्लक्ष; अंबेकर यांचा आंदोलनाचा इशारा
2 बीडच्या लक्ष्मीकांतची ‘कट्टय़ावरची थट्टा’!
3 लातूर महोत्सवात उद्या ‘सायकल डे’
Just Now!
X