News Flash

मुंबई पोलीस कर्करोगाच्या विळख्यात

तणाव आणि विविध आजारांनी त्रस्त असलेल्या मुंबई पोलीस दलाला आता कर्करोगाचा सामना करावा लागत आहे. मुंबई उपनगरातील वांद्रे परिमंडळातील २५ टक्के पोलिसांनी कर्करोगाची लक्षणे आढळून

| July 2, 2013 08:09 am

तणाव आणि विविध आजारांनी त्रस्त असलेल्या मुंबई पोलीस दलाला आता कर्करोगाचा सामना करावा लागत आहे. मुंबई उपनगरातील वांद्रे परिमंडळातील २५ टक्के पोलिसांनी कर्करोगाची लक्षणे आढळून आली आहेत. कॅन्सर पेशंटस असोसिएशनच्या वतीने मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यांमधील कर्करोग शोधण्यासाठी तपासणी मोहीम उघडण्यात आली आहे. वाद्रे परिसरातील २७ पोलीस ठाण्यातील १८५ पोलिसांची तपासणी केली असता ७५ टक्के पोलीस कर्मचारी तंबाखू सेवनाची सवय असल्याचे दिसून आले. तर त्यापैकी २५ टक्के पोलिसांमध्ये तोंडाच्या कर्करोगाची प्राथमिक लक्षणे आढळून आलेली आहेत. पोलिसांमधील कर्करोगाचे प्रमाण ही गंभीर बाब असून आता या पोलिसांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. प्रत्येक तीन आणि सहा महिन्यांच्या अंतराने पुन्हा त्यांची तपासणी करण्यात येणार असल्याचे सीपीएच्या संचालिका अनिता पीटर यांनी सांगितले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2013 8:09 am

Web Title: mumbai police are faceing cancer disease
टॅग : Loksatta,Marathi News,News
Next Stories
1 बालगुन्हेगारी : पोरखेळ नव्हे!
2 शून्य कचऱ्याच्या दिशेने वाटचाल..
3 गोरेगावात उद्या नागरिकांचा नगरसेविकेबरोबर फेरफटका
Just Now!
X