नवी मुंबई नाटय़ कलावंत संघाचे ५ वे एकदिवसीय नवी मुंबई जिल्हा नाटय़ संमेलन रविवारी २४ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत योगभवन हॉल, वाशी येथे आयोजित करण्यात आले आहे. नाटय़ संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल उपस्थितीत राहणार आहेत.
 या नाटय़ संमेलनात नाटकांच्या विविध विषयांवर परिसंवाद व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळच्या सत्रात ‘मराठी नाटकांना राजाश्रय व लोकाश्रय मिळणे महत्त्वाचे आहे का?’ हा परिसंवाद ज्येष्ठ रंगकर्मी रवी वाडकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून या परिसंवादात नाटककार व रंगभूमीवरील कलावंत सहभागी होणार आहेत. दुपारच्या सत्रात ‘बोलीभाषेतील नाटकांचा मराठी रंगभूमीवर प्रभाव’ हा परिसंवाद प्रा. एल. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या परिसांवादात ज्येष्ठ नाटय़ कलावंत व मान्यवर साहित्यिक व रंगकर्मी सहभागी होणार आहेत. संगीतकार अच्युत ठाकूर यांची मुलाखत रंगकर्मी मोहन भोईर घेणार आहेत. संध्याकाळच्या सत्रात ‘मुंबई ते लंडन व्हाया वस्त्रहरण’ हा खास कार्यक्रम गंगाराम गवाणकर व विलास गुर्जर सादर करणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क – मोहन भोईर – ९९६७०७७२५१७