‘फडताळात एक गाठोडे आहे, त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे, कुंच्या टोपडी, शेले शाली त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली पैठणी’ शांता शेळकेंच्या या ओळी गुणगुणताना सासर-माहेरच्या आठवणींची शिदोरी अलवार उलगडली जाते. आजही सुपर नेट, कलमकारी, जॉर्जेटच्या जमान्यात पैठणीच्या पदरावरील मोराचा तोरा कायम आहे. महिलावर्गाच्या पैठणीच्या अभिरुचीचे भांडवल करीत विक्रीतून लाखोंची उलाढाल करणारा व्यावसायिक आज कोटय़ाधीश झाला. मात्र पैठणीची जर, रेशीम धागा विणणारा विणकर आहे, त्या परिस्थितीत जगत आहे. या विणकर बांधवांना एकत्र करीत व्यवसायाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी येवला देवांग कोष्टी समाजातील विणकर एकत्रित झाले. अस्सल पैठणीचा वारसा अखंड राहावा आणि व्यवसायाच्या मुख्य प्रवाहात पाळेमुळे रुजावीत, यासाठी ‘शाकंबरी पैठणी’ संकेतस्थळाच्या माध्यमातून तिचे विपणन सुरू केले आहे.
येवल्यातील विणकर साडेतीन पीठासह विविध देवदेवतांचे रेशीम वस्त्रे विणण्याचे काम पिढय़ान्पिढय़ा करीत आहे. या व्यवसायात संबंधितांच्या पिढय़ान्पिढय़ा काम करीत आल्याने पैठणीचा रंग, पोत कमावण्याचे कौशल्य त्यांच्या बोटावर नाचते. बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी आवश्यक भांडवलासाठी मात्र या बांधवांना आजही विक्रेत्याच्या वा व्यावसायिकाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. अपुऱ्या भांडवलामुळे विणकर आजही व्यावसायिकांवर अवलंबून असल्याने त्यांना आपल्या व्यवसायासाठी भांडवल उभारता येत नाही. मालाचे विपणन करता येत नाही की व्यवसायात अद्ययावतता आणण्यासाठी आवश्यक साधनसामुग्री, माहिती उपलब्ध करून घेता येत नाही. दुसरीकडे, पाच-सहा महिने रात्र दिवस पैठणी विणण्यात गर्क असलेली कुटुंबे तर यांत्रिक साधनांचा वापर करीत अस्सल पैठणीसारखी मात्र यांत्रिकी पैठणी तयार करणारा व्यापारीवर्ग. यामुळे कमी श्रमात जास्त मोबदला हे समीकरण रुजेल. मूळ व्यवसायावर गंडातर येईल अशी स्थिती सभोवताली निर्माण होत असल्याने धास्तावलेला विणकर बांधव अस्वस्थ झाला.
या पाश्र्वभूमीवर, सहा महिन्यांपूर्वी कोष्टी समाजाच्या विविध उपक्रमांतर्गत ‘नवा विचार, नवी दिशा’ या उद्बोधक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यात विणकर बांधवांची सद्यस्थिती, त्यांच्यासमोरील आव्हाने यावर चर्चा झाली असता काही मंडळींनी एकत्र येत बांधकाम व्यावसायिक अमोल असलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्थिती बदलण्याच्या दृष्टीने छोटा उपक्रम हाती घेतला. ६००-७०० विणकर कार्यकर्ते एकत्र आले. कामगार दिनाचे औचित्य साधत त्यांनी आपल्या अस्सल पैठणीची माहिती देणाऱ्या संकेतस्थळाची निर्मिती केली. आर्थिक चणचण असल्याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा भूषण झाडे या युवकाने कुठलाही मोबदला न घेता ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.शांकबरीपैठणी.कॉम’ हे संकेतस्थळ विकसित केले. त्यावर कुठल्याही वलयांकित चेहऱ्याला प्राधान्य देण्याऐवजी व्यवसायाचा पाया असलेल्या हातमाग यंत्राला आपला राजदूत केले आहे. पारंपरिक हातमाग व्यवसाय, या माध्यमातून विणली जाणारी पैठणी, पैठणीचा इतिहास, पैठणी कशी तयार केली जाते, एकंदरीत प्रक्रिया याची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय विणकरांनी तयार केलेल्या विविध कलाकुसरीचे अत्यंत देखणे नमुने, समाजाची माहिती यावर संकलित करण्यात आली आहे. तसेच, त्यात पैठणीवरील डॉ. प्रसाद कुलकर्णी आणि प्रा. सीताराम निकुंभ यांचे शोधनिबंधाचा समावेश आहे.
‘अस्सल पैठणीसाठी’
पैठणीच्या जोरावर व्यावसायिक धनवान झाले. विणकरांचे शोषणच होत आहे. व्यापारीवर्गाकडून त्यांच्या आर्थिक क्षमतेचा गैरवापर करीत त्याला जाणूनबुजून मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यात आले. यासाठी देवांग कोष्टी समाजाला एकत्र करीत मुख्य प्रवाहात येणे, अस्सल पैठणी जागतिक बाजारपेठेत मानाने यावी, येथील विणकर सुखावला जावा तसेच यांत्रिक पैठणीला आळा बसावा यासाठी संकेतस्थळाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे.
अमोल असलकर

boyfriend sent bride nude photos on groom mobile phone to break marriage
वधूचे अश्लील छायाचित्र नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवले, हळदीच्या दिवशी प्रियकराच्या कृत्याने मोडले लग्न
Agreli
जपानच्या चलनाचा कच्चा माल पुरवतो हिमालयाच्या कुशीतला ‘हा’ देश!
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती
pune kothrud area fire broke out godown pandal material
कोथरुडमध्ये मंडप साहित्याच्या गोदामाला आग