प्राचीन व अर्वाचीन नाण्यांवर तत्कालीन राजवट, प्रशासक यांच्या संस्कृतीचा प्रभाव आहे. या नाण्यांचे प्रदर्शन भरविल्याने विद्यार्थ्यांना इतिहासाची ओळख व आवड निर्माण होते, असे प्रतिपादन आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांनी केले.
केमिस्ट भवन येथे अण्णाराव टाकळगव्हाणकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त जुन्या नाण्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. त्या प्रसंगी गोरेगावकर बोलत होते. जि. प. उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड, पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे, प्रा. मदन मार्डीकर आदी उपस्थित होते. टाकळगव्हाणकर यांनी अतिशय परिश्रमातून सहाव्या शतकापासूनच्या नाण्यांचा संग्रह केला. त्यामुळेच विद्यार्थ्यांना विविध देशांतील अनेकविध नाणी पाहण्याचा लाभ मिळू शकत आहे. अशा प्रदर्शनांतून निरीक्षणात्मक दृष्टिकोनाचा विकास विद्यार्थ्यांमध्ये होतो, असेही ते म्हणाले. प्रदर्शनात मांडलेल्या विविध नाण्यांची माहिती संजय टाकळगव्हाणकर यांनी विद्यार्थ्यांना दिली.