जिल्ह्य़ात काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या फळबाग व पिकांच्या नुकसानीसंदर्भात त्वरित अर्थसाह्य़ वाटप करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
मंत्रालयात बुधवारी आमदार राजीव सातव यांच्या पुढाकारातून कदम यांच्या दालनात बैठक झाली. पालकमंत्री वर्षां गायकवाड, आमदार नितीन राऊत व सातव यांची या वेळी उपस्थिती होती. फळबागा व पिकांसंदर्भात शेतकऱ्यांना अर्थसाह्य़ मिळण्याबाबत सातव यांनी मागणी केली होती.
त्यानुसार कदम यांनी आदेश दिले. तसेच २०११-१२ मधील सोयाबीन व कापसाचे नुकसानीचे अर्थसाह्य़ शेतकऱ्यांना मिळाले नाही, ही बाब सातव यांनी निदर्शनास आणून दिली. त्यानुसार निधी वाटपाचे आदेश देण्यात आले.
 एकूण १९ हजार हेक्टर नुकसानीचे क्षेत्र असल्याचे तहसीलदारांनी सांगितले.