वेदिक्युअर वेलनेस व संयुक्त उपचार पद्धतीतून प्राचीन भारतीय व अर्वाचीन औषधांचा समन्वय साधला जातो. प्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. अनिल पाटील यांनी प्रवर्तित केलेले हे तंत्र रोगाच्या लक्षणाऐवजी रोगाच्या मुळावर उपचार करण्यावर भर देते. डॉ. पाटील यांनी पत्रकार बैठकीत या बाबत माहिती दिली.
वंध्यत्व, स्थूलपणा, दमा अशा विविध गंभीर विकारांनी पीडित अनेक रुग्णांना ‘वेदिक्युअर वेलनेस क्लिनिक’च्या भेटीत संयुक्त उपचार पद्धतीचा फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या १२ वर्षांत अशा गंभीर विकारांनी पीडित सुमारे दीड-दोन लाखांहून अधिक रुग्णांनी ‘वेदिक्युअर वेलनेस’ केंद्रास भेट दिली. यातील ८० टक्के लोकांवरील संभाव्य शस्त्रक्रिया टाळण्यात ‘वेदिक्युअर’ यशस्वी ठरले. गेल्या १२ वर्षांत संधिवाताने पीडित रुग्णांवरील गुडघा व पाठीच्या कण्याच्या सुमारे २५ हजार शस्त्रक्रियाही संयुक्त उपचार या पद्धतीमुळे करणे शक्य झाले.
‘वेदिक्युअर’ या उपचार पद्धतीमुळे हजारो वंध्य दाम्पत्यांना संतती प्राप्त झाली, तसेच विविध गंभीर आजार असलेल्या रुग्णांनाही मोठा फायदा झाल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. रोगनिदानाच्या आधारे औषधोपचार करण्याच्या सुयोग्य पद्धती निवडून त्यांचा समन्वय साधत असताना यातील प्रत्येक पद्धतीच्या अस्सलतेबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही, यातच ‘संयुक्त उपचार पद्धती’चे यश सामावले आहे. असा समन्वय साधून ‘वेदिक्युअर’ने या विविध पद्धतींमधील उपचाराची ताकदही यशस्वीपणे वृद्धिंगत केली आहे. रुग्णांच्या गरजा लक्षात घेऊन त्या आधारे त्यांना जीवनशैली व्यवस्थापन करू देण्यावरही भर दिला जात असल्याने उपचारांची परिणामकारकता अधिकच वाढली आहे, असा दावाही त्यांनी केला.