विद्या वाकळे-चंद्रनाथन यांनी शिवाजी विद्यापीठास सादर केलेल्या ‘अ स्टडी ऑफ मेजर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, हायलाईटिंग इंडियन पेटेंट, कॉपीराईट्स, ट्रेडमार्क अँड डिझाईन लेजिस्लेशन वुईथ स्पेशल रेफरन्स टू दी राईट्स इनफ्रीजमेंट्स रेमिडीज अँड इम्प्लीमेंटेशन ऑफ दिज लेजिस्लेशन्स’ या विषयाच्या प्रबंधास मान्यता देऊन डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इन लॉ ही पदवी प्रदान केली आहे. कोल्हापूरचे प्रसिध्दकायदेतज्ञ डॉ. संतोष अरविंद शहा यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले आहे. पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क व डिझाईन या विषयावर संशोधन करून ही पदवी मिळविणाऱ्या विद्या वाकळे-चंद्रनाथन या एकमेव असून त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या लौकिकात भरच टाकली आहे. त्यांचे शिक्षण होलीक्रॉस, विवेकानंद कॉलेज, शहाजी लॉ कॉलेज व शिवाजी विद्यापीठ येथे झाले असून त्या सध्या दिल्ली येथे वकिली करत आहेत. कोल्हापूरचे इंटक वीज कामगार नेते व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चंद्रकांत वाकळे यांच्या त्या कन्या असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.