27 February 2021

News Flash

वरूणराजाने लावली सुट्टीच्या दिवशी हजेरी

तीन दिवसांच्या उघडपीनंतर वरूणराजाने सुट्टीचा दिवस असलेल्या रविवारी हजेरी लावली. दुपारी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्याने शहर पुन्हा जलमय झाले.

| June 24, 2013 01:06 am

तीन दिवसांच्या उघडपीनंतर वरूणराजाने सुट्टीचा दिवस असलेल्या रविवारी हजेरी लावली. दुपारी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्याने शहर पुन्हा जलमय झाले. तर पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात सातत्य राहिले. मृग नक्षत्रापासून पावसाने जोर धरला होता. आठवडाभर पावसाचे कमी अधिक प्रमाण होते. त्यानंतर दोन दिवस पावसाने उघडीप दिली होती. नंतर पुन्हा तो तीन दिवस पडत राहिला. मात्र गेल्या तीन दिवसांच्या विश्रातीनंतर आज शहरात पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले.    
पावसाने उघडीप दिल्याने हवेतील उष्मा काही प्रमाणात वाढला होता. आज दुपारपर्यंतही अशीच स्थिती होती. मात्र दुपारी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी तीन-चार वेळा आल्या. या पावसामुळे शहर पुन्हा एकदा जलमय झाले. मागील रविवारीही सुट्टीनंतर पावसाचे आगमन झाले आहे. त्याची पुनरावृत्ती आजही पावसाने केली. यामुळे विक एंडचा आनंद घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या शहरवासीयांच्या प्रयत्नावर पाणी फिरले. दरम्यान गगनबावडा, शाहूवाडी, भुदरगड, राधानगरी, चंदगड या डोंगराळ भागात चांगला पाऊस झाला. शिरोळ, हातकणंगले, कागल येथे पावसाची एखादी सर येऊन गेली. अन्य तालुक्यांतही तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2013 1:06 am

Web Title: rainfall in holiday
टॅग : Holiday,Rainfall
Next Stories
1 देशासंबंधीची जाणीव असणारा समाज निर्माण करण्याची गरज-विनय कोरे
2 टोलआकारणी विरुध्द आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याच्या प्रयत्नांना वेग
3 जैतापूर अणुवीज प्रकल्पात शिवसेनेची आडकाठी – अजित पवार
Just Now!
X