दैनंदिन जीवनात प्रत्येक विद्याथ्यार्ंचा विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंध येत असल्यामुळे या विषयाचा अभ्यास करताना निरीक्षण आणि संशोधनात्मकवृत्ती असणे आवश्यक आहे, त्यादृष्टीने विचार करा, असे आवाहन भारतीय सुदूर संवेदन संस्थेचे संचालक डॉ. वाय. व्ही. एन. कृष्णमूर्ती यांनी केले.
विज्ञान आणि समाज यामधील अंतर कमी करण्याच्या उद्देशाने रामन विज्ञान केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय ‘विज्ञान एक्स्पो’चे उद्घाटन डॉ. कृष्णमूर्ती यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला वैज्ञानिक एम.के. तिवारी, इस्त्रोचे व्यवस्थापक डॉ. के.जोशी, महापालिकेचे उपायुक्त महेश मोरोणे, जीएसआयचे डॉ. सरोलकर, केंद्राचे प्रकल्प संचालक श्रीकांत पाठक, विनोद लोकरे, सुरेंद्र अंकोलेकर, शिक्षणाधिकारी विलास चौधरी यावेळी उपस्थित होते.
यावेळी डॉ. कृष्णमूर्ती म्हणाले, विज्ञानामध्ये विद्यार्थ्यांंनी निरीक्षण शक्ती वाढविण्याची गरज आहे. आज आपल्याकडे माहिती तंत्रज्ञान आणि विज्ञानामध्ये नवनवीन शोध लागत असताना त्यावर संशोधन करण्याची गरज आहे. रामन विज्ञान केंद्राने विज्ञान एक्स्पोच्या निमित्ताने विद्यार्थ्यांंना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे याचा उपयोग करून विद्याथ्यार्ंनी याचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन डॉ. कृष्णमूर्ती यांनी केले.
विज्ञान आणि जीवन, विज्ञान आणि अभियांत्रिकी हे विषय एकमेकांशी निगडीत आहे. त्यामुळे विज्ञानाची भीती न बाळगता विद्यार्थ्यांंनी जास्तीत जास्त त्यासंबंधी माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. केवळ अभ्यास म्हणून या विषयाकडे बघू नका तर त्यामध्ये संशोधन करून नवीन काही करता येईल का त्यादृष्टीने विद्याथ्यार्ंनी विचार करावा. या प्रदर्शनाच्या निमित्ताने विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधीत विविध संघटना एकत्रित आल्या आहेत. संबंधीत संस्थाचे त्या त्या विषयात संशोधन सुरू आहे. त्यामुळे या प्रदर्शनाचा संशोधनात्मक दृष्टीने काय उपयोग होऊ शकतो याचा विचार विद्याथ्यार्ंनी करावा आणि प्रदर्शनाचा फायदा घेत नागपूरचे नाव संशोधनाच्या क्षेत्रात पुढे न्यावे, असे आवाहन डॉ. कृष्णमूर्ती यांनी केले.
यावेळी डॉ. मधुकर आपटे यांनी लिहिलेल्या ‘जगप्रसिद्ध खगोल वैज्ञानिक’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या ‘सायन्स एक्स्पो’मध्ये नागपुरातील परमाणू खनिज अन्वेषण व संशोधन संचालनालय, पट्रोलियम कॉन्झर्वेशन रिसर्च असोसिएशन, राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोग नियोजन विभाग, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, भारतीय मानव विज्ञान सर्वेक्षण, एम.जी. ऑटोमेश टेक्नॉलॉजी, विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान संस्था, रामन विज्ञान केंद्र व तारामंडळ, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, क्षेत्रीय सुदूर संवेदन केंद्र या १४ संस्था सहभागी झाल्या असून विद्यार्थ्यांंना वेगवेगळ्या विषयाची माहिती दिली जात आहे. शहरातील अनेक शाळेतील विद्याथ्यार्ंनी यावेळी प्रदर्शनाला भेटी देऊन माहिती घेतली. प्रदर्शनात विविध विषयावर विद्याथ्यार्ंसाठी मान्यवरांची भाषणे आयोजित करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे संचालन अभिमन्यू भेलावे यांनी केले. विलास चौधरी यांनी आभार मानले.