15 December 2019

News Flash

विज्ञान प्रदर्शन

शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई दक्षिण विभागाअंतर्गत येणाऱ्या सी आणि डी विभागातील विज्ञान प्रदर्शन मंगळवारपासून काळबादेवी येथील

| December 4, 2014 01:31 am

शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई दक्षिण विभागाअंतर्गत येणाऱ्या सी आणि डी विभागातील विज्ञान प्रदर्शन मंगळवारपासून काळबादेवी येथील डॉ. व्हिगास रोड येथील बरेटो शाळेत सुरू झाले असून शालेय विद्यार्थ्यांनी साकारलेले विविध प्रकल्प या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. या विज्ञान प्रदर्शनाचे उद््घाटन आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते झाले. या वेळी दक्षिण विभागाचे निरीक्षक बी. बी. चव्हाण, बरेटो विद्यालयाचे व्यवस्थापक फादर ज्युड बोतेल्हो आदी उपस्थित होते. प्रदर्शनाचा समारोप ४ डिसेंबर रोजी शिक्षण विभागाचे उपसंचालक बी. डी. फडतरे यांच्या हस्ते होणार असून या वेळी विल्सन महाविद्यालयाचे साहाय्यक प्राध्यापक डॉ. आशीष उसगरे, दक्षिण विभागाचे अधीक्षक ए. एस. दहीफळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई पश्चिम विभागाअंतर्गत येणाऱ्या आर (प.), के/पी (प.) व एच विभागातर्फे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शने आयोजित केली जाणार आहेत. एच विभागात २ डिसेंबरपासून एअर इंडिया मॉडर्न स्कूल सांताक्रूझ (पूर्व) येथे आणि के/पी (प.) या विभागात याच कालावधीत विवेक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयके/पी (प.) गोरेगाव (प.) येथे विज्ञान प्रदर्शन सुरू झाले असून ते ४ डिसेंबर्रपत चालणार आहे; तर आर (प.) विभागाचे विज्ञान प्रदर्शन ९ ते ११ डिसेंबर या कालावधीत दयानंद विद्यालय चारकोप, कांदिवली (प.) येथे आयोजित होणार आहे. या विज्ञान प्रदर्शनाला मुख्य विषय चिरंतर विश्वासाठी विज्ञान आणि गणित हा देण्यात आला आहे. या प्रदर्शनात पश्चिम मुंबईतील वांद्रे ते दहिसपर्यंतचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सहभागी होणार आहेत. हे प्रदर्शन शिक्षण उपनिरीक्षक राजिंदर कौर-थिंद व एस. जी. मुजावर यांच्या नियंत्रणाखाली आयोजित करण्यात येणार आहे. ही प्रदर्शने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळात सर्वासाठी खुले राहणार आहेत.

First Published on December 4, 2014 1:31 am

Web Title: science exhibition 2
टॅग Science Exhibition
Just Now!
X