News Flash

लाचखोर पठाणच्या सदनिकेत बँक पासबुकांसह रोकड जप्त

राज्य वक्फ महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. डी. पठाण यांच्या शहरातील भाडय़ाच्या सदनिकेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला.

| July 2, 2013 01:06 am

राज्य वक्फ महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. डी. पठाण यांच्या शहरातील भाडय़ाच्या सदनिकेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. या वेळी घेतलेल्या झडतीत १९ हजार ८१० रुपये रोख व ३ बँकांची खाते पुस्तिका पोलिसांच्या हाती लागली. पुढील तपासासाठी ती माहिती नांदेडच्या अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली आहे.
औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड व जालना येथे वक्फ महामंडळाअंतर्गत बऱ्याच जमिनींचे व्यवहार आहेत. मोक्याच्या ठिकाणी असलेले अनेक भूखंड ९९ वर्षांच्या करारानेही देण्यात आले आहेत. काही जमिनींवर अतिक्रमणे झाली असून पक्की बांधकामे झाली आहेत. या प्रत्येक व्यवहारात हितसंबंध दडले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी पठाण यांच्या घरी रविवारी १ कोटी १९ लाख रुपये सापडले. ही रोकड मोजण्यासाठी रात्री उशिरा पोलिसांना पैसे मोजण्याचे यंत्र मागवावे लागले. पठाण अंबाजोगाई येथील मूळ रहिवासी असून तेथेही लाचलुचपत विभागाकडून चौकशी केली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2013 1:06 am

Web Title: seized bank passbook with cash in flat of corrupt pathan
टॅग : Flat
Next Stories
1 पठाणच्या मालमत्तेचा कासवगतीने शोध; विभागावरच संशयाचे ढग!
2 वक्फ बोर्डाच्या लाचखोर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे १ कोटी १९ लाख सापडले
3 भोकर येथील रस्त्याचे काम निकृष्ट; तक्रारीला केराची टोपली
Just Now!
X