नांदेड-वाघाळा महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर नवीन महापौर निवडीच्या हालचालींना वेग आला असून, स्पष्ट बहुमत प्राप्त केल्याने काँग्रेसचाच महापौर होणार, हे स्पष्ट आहे. पुढील आठवडय़ात नवीन महापौरांची निवड होणार आहे. दरम्यान, अनेक दिग्गजांचा पराभव झाल्याने या पदासाठी आता दोनतीन नावांची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हेच याबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत.
नांदेडचे प्रथम महापौर सुधाकर पांढरे, डॉ. शीला कदम, दिलीप कंदकुर्ते, गंगाबाई कदम, बाळासाहेब देशमुख, फारूख अली खाँ, किशोर भवरे, मोहिनी कनकदंडे, दिलपाकसिंह रावत, विनय गिरडे, सरजितसिंग गिल, अब्दुल सत्तार, सुदर्शना खोमणे, वीरेंद्रसिंग गाडीवाले, गफार खान, तुलजाराम यादव, ज्योती खेडकर, शांताबाई मुंडे, गंगासागर अन्न्ोवार यांनी आपापल्या प्रभागातून पुन्हा विजय मिळवत महापालिकेत प्रवेश निश्चित केला. यंदा अनेक नवीन सदस्य निवडले गेले. प्रवीण बियाणी, सविता कंठेवाड, सुधाकर पांढरे यांच्या कन्या स्नेहा पांढरे, आमदार पोकर्णा यांचे पुत्र नवल, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख विनय गुर्रम, जयश्री जाधव, माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे पुतणे संदीप चिखलीकर, अभिषेक, करुणा जमदाडे, वैशाली देशमुख, आनंद चव्हाण, अशोक उमरेकर, सुंदरलाल गुरखुद्दे यांनी प्रथमच विजय मिळविला.
काँग्रेसचे माजी महापौर बलवंतसिंग गाडीवाले, सुभाष रायबोळे, उमेश चव्हाण, भगिंदरसिंग घडीसाज, म. रज्जाक, म. अन्वर, अब्दुल शमीम, राष्ट्रवादीचे सुभाष मंगनाळे, जीवन घोगरे, म. मुखीद, शिवसेनेचे प्रमोद खेडकर, मुकुंद जवळगावकर, जयश्री ठाकूर, संगीता बियाणी, भाजपचे चैतन्य देशमुख, जयश्री जिंदम, नम्रता लाठकर या विद्यमान नगरसेवकांना मतदारांनी घरी बसविले.    
प्रभागनिहाय विजयी उमेदवार-
प्रभाग १- गंगाबाई कदम, बाळासाहेब देशमुख, प्रभाग २- श्रीनिवास सातोलीकर, शैलेजा स्वामी, प्रभाग ३- नागाबाई कोकाटे, उमेश पवळे, प्रभाग ४- सविता कंठेवाड, प्रवीण बियाणी, प्रभाग ५- स्नेहा पांढरे, आनंद चव्हाण, प्रभाग ६- फारूख अली खाँ, अंजुम बेगम, प्रभाग ७- शांता मुंडे, बालाजी कल्याणकर, गंगासागर अन्न्ोवार, प्रभाग ८- किशोर भवरे, शीला कदम, प्रभाग ९- सुधाकर पांढरे, मोहिनी कनकदंडे, प्रभाग १०- वाजेदा तबस्सुम, सय्यद जानीभाई, प्रभाग ११- सोनाबाई मोकले, नवल पोकर्णा, प्रभाग १२- जयश्री जाधव, विनय गुर्रम, प्रभाग १३- वीरेंद्रसिंग गाडीवाले, प्रभावती चव्हाण, प्रभाग १४- अशोक उमरेकर, पार्वती जिंदम, प्रभाग १५- कमलबाई मुदिराज, दिलीप कंदकुर्ते, प्रभाग १६- रजिया बेगम, सलिमा बेगम, प्रभाग १७- शंकर गाडगे, वैशाली देशमुख, प्रभाग १८- अंजली गायकवाड, बाळासाहेब देशमुख, प्रभाग १९- इसरत फातेमा, गफ्फार खान, प्रभाग २०- गणपत धबाले, अनुजा तेहरा, प्रभाग २१- तुलजाराम यादव, पुष्पा शर्मा, प्रभाग २२- ज्योती खेडकर, गुरमितसिंग नवाब, प्रभाग २३- संगीता रावोत्रे, सरजितसिंग गील, प्रभाग २४- बिपाशा बेगम, अब्दुल हबीब अ. रहीम बागवान, प्रभाग २५- अब्दुल फसिया (बिनविरोध), अब्दुल सत्तार, प्रभाग २६- असीया बेगम, सय्यद शेर अली, प्रभाग २७- इसरत फातेमा, कुरेशी चाँदपाशा, प्रभाग २८- तहसीन बेगम, फारूख हुसेन, प्रभाग २९- लक्ष्मीबाई कोकुलवार, सतीश राखेवार, प्रभाग ३०- कुरेशी शफी अहेमद, चाऊस हसीना बेगम, प्रभाग ३१- अब्दुल लतीफ, झाकिया बेगम, प्रभाग ३२- सुंदरलाल गुरुखुंदे, सुदर्शना खोमणे, प्रभाग ३३- बावजीर शेख हबीब, लतिफा बेगम बुऱ्हाण खान, प्रभाग ३४- दीपकसिंह रावत, अन्नपूर्णा ठाकूर, प्रभाग ३५- किशोर यादव, गुरप्रीत कौर सोडी, प्रभाग ३६- वैजयंती गायकवाड, संजय मोरे, प्रभाग ३७- अभिषेक सौदे, सिंधू काकडे, प्रभाग ३८- मंगला देशमुख, संदीप चिखलीकर, प्रभाग ३९- ललिता बोखारे, विनय पाटील, प्रभाग ४०- करुणा जमदाडे, इंदूबाई घोगरे.