शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व लातूर बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र गिल्डा यांचे अंबाजोगाई-लातूर रस्त्यावर सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अपघाती निधन झाले. त्यांच्यासोबत त्यांचा चालकही जागीच ठार झाला.
औरंगाबादला नातेवाइकांचा विवाह समारंभ आटोपून गिल्डा आपल्या आल्टो गाडीतून (एमएच २४ सी ७१०६) लातूरकडे निघाले होते. रात्री एकच्या सुमारास अंबाजोगाईजवळील सायगावनजीक समोरून येणाऱ्या मालमोटारीने धडक दिल्यामुळे राजेंद्र गिल्डा (वय ५२) व त्यांच्या गाडीचा चालक संजीवप्रसाद सूर्यवंशी (वय २९, जुनेगाव हाडगा, तालुका निलंगा) जागीच ठार झाले. या प्रकरणी मालमोटार चालकाविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
गिल्डा हे चळवळीतले कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होते. शिवसेनेचे शहरप्रमुख असताना लातूर शहरात सेनेचे काम वाढवण्यासाठी त्यांनी चांगले परिश्रम घेतले. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुले, ४ भाऊ असा परिवार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 1, 2013 1:24 am