मलकापूरमधील इयत्ता दहावीच्या मराठी व इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी आयएसओ ९००१-२००८ प्रमाणित व प्रसिध्द असलेल्या अक्षरशिल्प हॅन्ड रायटिंग अॅकॅडमीच्या माध्यमातून गुणवत्ता विकास प्रकल्प राबविला जाणार आहे.
उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मलकापूर नगरपंचायत, मनोहर शिंदे मित्रमंडळ, मलकापूरातील शाळा व क्लासेस यांच्या सहकार्याने दहावीच्या मराठी व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रात प्रथमच संचलित करीत असलेल्या आयएसओ ९००१-२००८ प्रमाणित व प्रसिध्द असलेल्या अक्षरशिल्प हॅन्ड रायटिंग अॅकॅडमीच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास होण्यासाठी हा उपक्रम मलकापूर नगरपंचायत नवीन बहुउद्देशीय इमारतीमध्ये राबविला जाणार आहे.
मराठी व इंग्रजी हस्ताक्षर सुधारणेसाठी कॉपीराईट अभ्यासक्रमासह प्रामाणिकपणे प्रयत्न करणारी ही महाराष्ट्रातील आयएसओ प्रमाणित एकमेव संस्था आहे. ठाणे, डोंबिवली, मुंबई महानगरपालिका तसेच रायगड जिल्हा परिषद याठिकाणी हजारो विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाचा लाभ घेतला आहे. केवळ १२ तासात विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारून त्यांना आदर्श उत्तरपत्रिका लिखानाचे कौशल्य शिकवले जाते. या प्रकल्पासाठी शंभर विद्यार्थ्यांंची निवड केली जाणार असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी  संपर्क साधावा असे आवाहन मनोहर शिंदे मित्र मंडळाने केले आहे.