कुष्णाबाई संस्थान घाट धर्मपुरी वाई यांच्या वतीने २९ व्या राज्यस्तरीय गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. २१ ते शनिवार २३ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या शास्त्रीय नाटय़ व सुगम संगीत स्पर्धेसाठी १५ ते ३५ वयोगटातील स्पर्धकांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुगम संगीतासाठी ८ ते १४ हा बालगटही आहे. बालगटासाठी संगीतातील विजेत्यांना तीन हजार एक, दोन हजार एक व एक हजार एक; तर नाटय़ व सुगम संगीतासाठी दोन हजार एक, पंधराशे एक व एक हजार एक अशी बक्षिसे असतील. याशिवाय उत्तेजनार्थ बक्षिसेही आहेत. नावनोंदणीसाठी वाई येथे अमित सोहनी ९०२८४३५७५८ व पुणे येथे कृष्णाजी बल्लाळ आणि कं. (०२०) २४४७२०७६ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
Liquor Licenses pune
पुण्यात ४ जूनपर्यंत दारूचे नवे परवाने, रिन्युएशन बंद
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी