News Flash

तात्यासाहेब कोरे हे द्रष्टे समाजसुधारक-राज्यपाल

स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांनी सहकार चळवळीबरोबरच सर्वच क्षेत्रात क्रांतिकारक निर्णय घेऊन सर्वसामान्य जनतेला समृध्द करुन प्रगतीकडे नेले.

| November 4, 2013 02:03 am

स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांनी सहकार चळवळीबरोबरच सर्वच क्षेत्रात क्रांतिकारक निर्णय घेऊन सर्वसामान्य जनतेला समृध्द करुन प्रगतीकडे नेले. आयुष्य़भर जनकल्याणासाठी झटणाऱ्या तात्यांनी वारणा परिवाराचा दुग्ध व्यवसायातील ‘वारणा ब्रॅन्ड’ जगासमोर आणला  व तात्यासाहेबांचे स्वप्न विनय कोरे यांनी पूर्णत्वाकडे नेले, असे प्रतिपादन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले.
तात्यासाहेब कोरे नगर येथील श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रकल्प या संघाच्या सहकार क्षेत्रातील नावीन्यपूर्ण आणि क्रांतिकारी ग्राहक शेअर्स वितरण शुभारंभ आणि जातिवंत दुधाळ जनावरांचे प्रदर्शन व बक्षिस वितरण समारंभ राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते झाला,त्या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
राज्यपाल श्रीनिवास पाटील म्हणाले,की अनेक उद्योगांची गुंफण निर्माण करताना आधुनिकतेची जोड दिल्याने स्वर्गीय तात्यासाहेब कोरे हे द्रष्टे समाजसुधारक होते. त्यांच्या दूरदृष्टीने वारणा परिसरातील दारिद्रय़ दूर होण्याबरोबरच सर्वागीण विकास झाला. त्यांची स्वप्नपूर्ती होत आहे.परंतु त्यामध्ये नवनवे प्रयोग विनय कोरे यांनी करुन प्रगतीला सातत्याने यशाच्या शिखरावर ठेवावे, असे सांगून दुधावर तसेच जनावरांच्या मलमूत्रावर संशोधन करणारी केंद्रे निर्माण झाल्यास दुग्ध व्यवसाय समृध्द बनेल, यासाठी  सातत्याने नव्याचा शोध घेवून त्याची पूर्तता करण्याचे काम नव्या पिढीने हातात घेऊन शेती व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवून द्यावी, असे आवाहन श्रीनिवास पाटील यांनी केले.
आमदार विनय कोरे यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात वारणा दूध संघाच्या माध्यमातून झालेल्या विकासाचा आढावा घेतला.वारणेचा ब्रॅन्ड देशाबरोबरच जगातही पोहोचल्याने वारणेचा नावलौकिक वाढत आहे.वारणाची सर्व उत्पादने बाजरपेठेत वाढल्याने ग्राहकांनाही वारणा परिवारात सामावून घेण्यासाठी सहकार क्षेत्रात प्रथमच ग्राहकांना शेअर्स देण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. त्यास मोठा प्रतिसाद मिळाल्याने वारणावर  ग्राहकांचा मोठा विश्वास असल्याचे सांगितले. खासगी दूध क्षेत्राचे सहकारावर अतिक्रमण होत असल्याने या धंद्याला आर्थिक स्थर्य देणारी शक्तिशाली चळवळ उभा करण्याचा मानस कोरे यांनी व्यक्त केला.
प्रथम आयोजित केलेल्या जनावरांच्या प्रदर्शनास भेट देऊन राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी माहिती घेतली. त्यानंतर जाहीर कार्यक्रमात त्यांचा आमदार विनय कोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.त्यानंतर सर्वोच्च दूध पूरवठा करणाऱ्या संस्थांचा व व्यक्तींचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी वारणा दूध संघाचा पहिला ग्राहक सभासद होण्याचा मान श्रीनिवास पाटील यांना देण्यात आला. त्यांनी शेअर्स पावती घेऊन शुभारंभ केला.
या वेळी व्यासपीठावर अध्यक्ष डॉ.भाऊसाहेब गुळवणी,उपाध्यक्ष विलासराव पाटील,वारणा कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांच्यासह वारणा समूहातील पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. डॉ.भाऊसाहेब गुळवणी यांनी आभार मानले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2013 2:03 am

Web Title: tatyasaheb kore was social reformer of brand vision governor
टॅग : Kolhapur
Next Stories
1 लाचप्रकरणी आता आर्थिक मध्यस्थी करणाऱ्यांवरही कारवाई- श्रीहरि पाटील
2 भाई पंजाबराव डाव्या विचाराचे सच्चे, परखड व बाणेदार नेते- बी. आर. पाटील
3 ऐन दिवाळीत शहराच्या पाणीपुरवठय़ावर परिणाम
Just Now!
X