महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाने दिलेल्या आदेशानुसार २१ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बारावीच्या लेखी परीक्षांच्या मूल्यमापनाचे कामकाज मुख्य नियामक, वरिष्ठ नियामक हे नियामक व परीक्षण करणार नाहीत, असे पत्रक शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष प्रा. एस. बी. उमाटे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
विद्यार्थी व पालकांचे हित लक्षात घेऊन आणि विद्यार्थ्यांना तणावमुक्त परीक्षा देण्यासाठी महासंघाच्या आदेशानुसार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी १२ वी भाषा विषयांच्या तोंडी परीक्षा, विज्ञान प्रात्यक्षिक परीक्षा घेतलेल्या आहेत. राज्य शिक्षण मंडळास व राज्य शासनास सहकार्य केले आहे. २१ फेब्रुवारीला सुरू होणाऱ्या लेखी परीक्षेचे पर्यवेक्षणाचे कामकाज शिक्षक करणार आहेत; पण शासनाने शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष करू नये, असेही पत्रकात म्हटले आहे.