‘फोर जी’ची पहिली झलक, रोबो वॉर, डॉ. सी. एन. आर. राव, किरण बेदी यासह विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची व्याख्याने, रोबोंचा नृत्याविष्कार अशा भरगच्च वेळापत्रकाने शुक्रवारपासून मुंबई आयआयटीच्या टेकफेस्टची सुरुवात होणार आहे. नव्या वर्षांचा पहिला वीकेंड हा या टेकफेस्टसाठी अनेकजण मोकळा ठेवतच असतात. शुक्रवार ते रविवार रंगणाऱ्या या टेकफेस्टमध्ये टेकज्ञान, टेक्नोटेनमेंट आणि टेक्नोविष्काराचा अनोखा संगम पाहावयास मिळणार आहे. या महोत्सवात देशपरदेशांतील विद्यापीठे सहभागी होत असतात. या फेस्टिव्हलची आणखी एक खासियत म्हणजे यामध्ये लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत प्रत्येकाला उपयुक्त अशा गोष्टी पाहवयास मिळतात. यंदाच्या टेकफेस्टमध्ये पाहण्या-ऐकण्यासारखे काय काय आहे त्याची ही झलक..
काय पाहाल?
टेकफेस्टमधील तंत्रज्ञानाशी संबंधित प्रदर्शनाची सर्वानाच उत्सुकता असते. यंदा त्यात विविध प्रकारचे रोबो पाहावयास मिळणार आहेत. यामध्ये गप्पा मारणाऱ्या ‘बिना ४८’, फुटबॉल खेळणाऱ्या ‘फ्युमानाईड’, वृद्धांची काळजी घेणारा ‘जॅक अ‍ॅण्ड मटिल्डा’ आधी अफलातून रोबोंबरोबरच प्रयोगशाळेत, युद्धात वापरले जाणारे ‘रोबो’ असणार आहेत. मानवी भावना ओळखणारे आणि त्यानुसार प्रतिसाद देणारे रोबोही आंतराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये पाहता येतील. अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, जपान, इस्त्रायल आदी देशांमध्ये हे रोबो तयार करण्यात आले आहेत.
तोच अनुभव टेकफेस्टमध्ये ‘ओझन’ या शीर्षकाखाली आयोजिण्यात आलेल्या खेळांमध्ये देण्याचा आमचा प्रयत्न आहे,’ असे ‘टेकफेस्ट’च्या आयोजकांपकी एक असलेल्या सहेशा या विद्याíथनीने सांगितले. या स्पर्धामध्ये कुणालाही सहभागी होता येईल. खेळांबरोबरच जंकयार्ड वॉर्स, पझल मेनिया, टेकफेस्ट फिटेस्ट आदी स्पर्धाचे आयोजन टेकफेस्टमध्ये करण्यात आले आहे. आयआयटीच्या रस्त्यांवरून जाता-येताही विविध प्रकारच्या गमतीशीर व मनोरंजनात्मक खेळांचा आनंद घेता येणार आहे. यात आपल्या अफलातून कलेचे प्रात्यक्षिक सादर करणाऱ्या परदेशी कलाकारांचा समावेश असेल. यामध्ये आपल्याला एफवन सिम्युलेटरवर थरारक अनुभव यात घेता येईल. एखाद्या नेव्ही सील प्रमाणे रॉक क्लायिम्बग करण्याचा अनुभवही यामध्ये आपल्याला अनुभवता येणार आहे.
याशिवाय या प्रदर्शनांमध्ये आणखी एक खासियत आहे ती म्हणजे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ)च्या विविध शस्त्रास्त्र पाहवयास मिळणार आहे. भारताच्या संरक्षण क्षमतेचा अंदाज आपल्याला या प्रदर्शनामधून घेता येणार आहे. याशिवाय एफवन कार, मर्सििडझ, पोर्शे आदी जगातील सर्वाधिक महागडय़ा व आलिशान गाडय़ांचे प्रदर्शनही यंदाच्या टेकफेस्टमध्ये पाहवयास मिळणार आहे.
काय ऐकाल?
या फेस्टिव्हलमधील व्याख्याने ही सर्वाच्या उत्सुकतेचा विषय असतो. यंदा भारतरत्न डॉ. सी. एन. आर. राव, किरण बेदी, सिक्थ सेन्सचा शोध लावणारा प्रणव मेस्त्री, पर्यावरणतज्ज्ञ राजेंद्र पचौरी, उद्योजक कंवल रेखी, गणितज्ज्ञ स्टिफन वॉलफॉर्म, इन्स्टिटय़ूट ऑफ इलेक्ट्रिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्सचे अध्यक्ष जार्डन डे, फोटोशॉपचा उदय करणारे सीतारामन नारायणन, अमेरिकेतील भारतीय आर्किटेक्ट ख्रिस्तोफर चार्ल्स, औषध उद्योगात ठसा उमटविणारे हेन्री बोरीस केगन, एमआयटी लॅबमधील शास्त्रज्ञ वॉल्टर बेंडन यांची व्याख्यााने होणार आहेत. ही सर्व व्याख्याने सर्वासाठी खुली असून त्याच्या वेळापत्रकासाठी http://www.techfest.org/Schedule_2k14.pdf या संकेत स्थळावर भेट द्या.