स्वांतत्र्य प्रत्येकाला मानवतेच, असे नाही. विशेषत आठवत असल्यापासून िपजरयामध्येच राहिलेल्या प्राण्यांना तर ते त्रासदायकच वाटते. त्यातच तो प्राणी म्हणजे वाघ असला तर त्याला मुक्त करणारया वनाधिकारयांचाही श्वास रोखलेलाच असतो. मात्र संजय गांधी उद्यानात नुकताच हा प्रयोग यशस्वी झाला आणि वाघासोबत वनाधिकारयांनीही मोकळ्या हवेत श्वास घेतला.
त्याचे झाले असे की पर्यटकांना वाघ व सिंह पाहता यावेत यासाठी बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात व्याघ्र व सिंह सफारी आखली जाते. या दोघांसाठी वेगळी कुंपणे आहेत. वाघांचे कुंपण काही ठिकाणी तुटल्याने गेली दहा वष्रे व्याघ्रसफारीतील नऊ वाघ छोट्या िपजरयात बंदिस्त होते. मात्र ब्ह्य’ा कुंपणाची दुरुस्ती विलंबाने का होईना, पूर्ण झाली आणि आता वाघांना फिरण्यासाठी पुन्हा मोठा परिसर उपलब्ध झाला. अर्थात एवढी वष्रे िपजरयात बंदिस्त असलेल्या वाघांना मोकळ्या परिसरात एकदम सोडणे शक्य नाही. त्यामुळे शनिवारी नऊपकी एका वाघाला – पलाशला त्याच्या िपजऱ्यातून बाहेर काढण्याचा निर्णय झाला. िपजरयाचा दरवाजा उघडल्यावर सुरुवातीला पलाश काहीसा गांगरला, मात्र त्यानंतर त्याने बाहेर येऊन परिसर न्याहाळायला सुरुवात केली. बाजूच्या झाडाच्या खोडावर पंजेही घासले आणि थोडे दूर जाऊन तलावातील पाण्याचीही सफर केली. बारा वर्षांचा पलाश बाहेरच्या परिसरात सामान्य पद्धतीने फिरू लागल्याने सर्वानीच निश्वास सोडला.. लवकरच इतर आठ वाघांनाही िपजरयाबाहेर येऊ दिले जाईल.
बिबट्यांच्या मृत्यूंमुळे गेले काही महिने सतत चच्रेत राहिलेल्या बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बछड्यांच्या आगमनानंतर ही आणखी एक चांगली घटना घडली आहे. व्याघ्र सफारीच्या काही ठिकाणी तुटलेल्या कुंपणामुळे गेली दहाहून अधिक वष्रे वाघांना छोट्या िपजरयात राहावे लागत होते. उद्यानात येणारे पर्यटक तसेच आदिवासी पाड्यांमध्ये वाघ जाण्याची भीती लक्षात घेऊन खबरदारी घेण्यात आली तरीही त्यासाठी वाघांना स्वतचे स्वातंत्र्य गहाण टाकावे लागले होते. आता मात्र पुन्हा एका मर्यादित स्वातंत्र्यात फिरण्याची वाट मोकळी झाली आहे.
सफारीमध्ये सर्व वाघांना एकत्रित सोडता येणार नाही. प्रत्येक वाघाला एकएकटे सोडून त्याचे निरीक्षण केले जाईल. स्वभाव लक्षात घेऊन दोन वाघांना एकत्रित सोडण्याचाही प्रयोग करता येईल. मात्र त्यासाठी वेळ आहे. सध्या पलाश या वातावरणात रमतो आहे, ही सकारात्मक घटना आहे, असे मुख्य वनसंरक्षक विकास गुप्ता यांनी सांगितले.