केंद्रीय गृहमंत्री सुशीलकमार शिंदे हे उद्या शनिवारपासून दोन दिवसांच्या भेटीवर सोलापूरला येत आहेत. या भेटीत ते ‘रोजा इफ्तार’ पार्टीतही सहभागी होणार आहेत. याशिवाय डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार वितरण समारंभासही ते हजेरी लावणार आहेत. हे दोनच कार्यक्रम त्यांनी या दोन दिवसांच्या भेटीत स्वीकारले आहेत.
शिंदे हे उद्या सकाळी मुंबईहून सिद्धेश्वर एक्स्प्रेसने सोलापुरात दाखल होणार आहेत. सायंकाळी ६.४५ वाजता पोलीस मुख्यालयाजवळील अ‍ॅचिव्हर मंगल कार्यालयात माजी महापौर आरिफ शेख यांनी आयोजिलेल्या रोजा इफ्तार पार्टीत शिंदे सहभागी होणार आहेत. तर रविवारी, २८ जुलै रोजी डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणा-या पुरस्कार वितरण सोहळय़ास प्रमुख पाहुणे म्हणून ते हजर राहणार आहेत. त्यांच्या हस्ते ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांना समाजसेवेसाठी, तर प्रा. निशिकांत ठकार यांना साहित्यसेवेसाठी डॉ. फडकुले स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रात्री ते रेल्वेने मुंबईकडे प्रयाण करतील.