News Flash

बहिरमजवळील अपघातात २ ठार

परतवाडा-बहिरम मार्गावर खरपीजवळ महिंद्रा बोलेरो वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन ठार, तर अन्य एक किरकोळ जखमी झाला.

| March 17, 2013 12:51 pm

परतवाडा-बहिरम मार्गावर खरपीजवळ महिंद्रा बोलेरो वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन ठार, तर अन्य एक किरकोळ जखमी झाला.
प्रकाश सदमाके (२७, रा. आझादनगर, परतवाडा) आणि सुंदर गुर्जर (२८, रा. राजस्थान, ह.मु. परतवाडा) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही बांधकाम कारागीर होते. एका सहकाऱ्यासह ते मोटरसायकलीने मध्यप्रदेशातील खोमई येथे जात असताना खरपी फाटय़ाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव बोलेरो वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेत तिघेही मोटरसायकलस्वार दूरवर फेकले गेले. प्रकाश सदमाके याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या सुंदर गुर्जर याचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला. त्यांचा सहकारी या अपघातात किरकोळ जखमी झाला. अपघातानंतर बोलेरोचालक वाहनासह पसार झाला होता, त्याला  ताब्यात घेण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2013 12:51 pm

Web Title: two died in accident near bahiram
Next Stories
1 उजाड खाण परिसरात वृक्षारोपण करा -क्षत्रीय
2 नागपूर जिल्ह्य़ात पाणी कपातीचे संकट
3 राज ठाकरे विदर्भात; सलग दहा दिवस मुक्काम
Just Now!
X