भारतीय स्टेट बँक महाबळेश्वर शाखेने ऐन उन्हाळी हंगामात पाणी साठवण टाकी दिली. त्यामुळे इतके दिवस गावाला सातत्याने भेडसाविणारा पाणी साठवण्याचा प्रश्न मिटेल. बँकेने केलेल्या सहकार्याबद्दल महाबळेश्वर शाखेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी वंृदाचे धनगरवाडी ग्रामस्थ ऋणी आहेत, असे विचार धनगरवाडी (बोंडारवाडी) गावचे ग्रामसेवक आर. बी. सपकाळ यांनी व्यक्त केले.
महाबळेश्वर तालुक्यातील धनगरवाडी (बोंडारवाडी) या पाणीटंचाईग्रस्त गावास स्टेटबँक महाबळेश्वर शाखेच्या वतीने ५००० लिटर क्षमता असलेली टाकी देण्यात आली. यावेळी धनगरवाडी ग्रामस्थांच्या वतीने बँकेचे आभार मानताना ग्रामसेवक सपकाळ यांनी वरील भावना व्यक्त केल्या. यावेळी माजी उपसरपंच धोंडीबा डावले, माजी सरपंच दगडू नारायण डोईफोडे, स्टेट बँकेचे अधिकारी महेंद्र शेवाळे, (शाखाधिकारी) माधवराव शिंदे, रामदास पवार, वर्षां डेकर, आनंदा डोईफोडे, शांताराम रामचंद्र डावले, दत्तात्रय डोईफोडे, धोंडू ठकू आखाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
महाबळेश्वर तालुक्यातील धनगरवाडी (बोंडरवाडी) हे गाव पाणी टंचाईग्रस्त गाव आहे. या गावात लांब पल्ल्यावरून पाणी आणले जाते, मात्र पाणी साठवण करण्याची तेथे सोय नव्हती. महाबळेश्वर स्टेट बँक परिवाराच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी या गावाची पाहणी करून खात्री झाल्यानंतर ५००० लिटरची टाकी बँकेच्या वतीने देण्याचे निश्चित केले. अशी माहिती यावेळी महाबळेश्वर शाखेचे शाखा व्यवस्थापक महेंद्र शेवाळे यांनी दिली. स्टेट बँक महाबळेश्वर शाखेतर्फे नेहमीच सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविले जातात व हुशार गरजूंना मदत केली जाते. त्यात विद्यार्थिनी दत्तक घेणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करणे, शाळांना संगणक देणे, पंखे देणे, शैक्षणिक साहित्य देणे आदींचा समावेश आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक आर. बी. सपकाळ यांनी केले. मान्यवरांचे स्वागत माजी उपसरपंच धोंडीबा डावले यांनी केले तर आभार प्रदर्शन माजी सरपंच दगडू नारायण डोईफोडे यांनी केले. कार्यक्रमास रमाकांत धोंडू आखाडे, संतोष आखाडे, मारुती डोईफोडे, तुकाराम बबन शिंदे, धोंडू डोईफोडे, भिकन डोईफोडे, सुनिता चंद्रकांत शिंदे, रंजना रामचंद्र डोईफोडे, सुनिता नथुराम डावले, नारायण डोईफोडे, भिकन भागू डोईफोडे, सुरेश धोंडीबा डोईफोडे, मुख्याध्यापक धनगरवाडी वळवीसर, संजय धाकू ढेबे व ग्रामस्थ उपस्थित होते.