खंडाळा तालुक्यातील कवठे स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयाच्या दारातच मृतदेह आणून ठेवल्याने तणाव निर्माण झाला.
कवठे ता. खंडाळा येथील गामस्थाचे निधन झाले. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आला. मात्र स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने व मागणी करूनही रस्त्याची गरसोय होत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह खंडाळा तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारात आणून ठेवला व ठिय्या आंदोलन केले. मृतदेहासह अचानक झालेल्या गावक-यांच्या आंदोलनाने तहसील कार्यालय परिसरात एकदम तणावाचे वातावरण तयार झाले. स्मशानभूमीत जाण्या-येण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता मिळाल्याशिवाय मृतदेह हलवणार नाही व अंत्यसंस्कारच करणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने प्रशासनाची चांगलीच पळापळ झाली.
यानंतर तहसीलदार योगेश खरमाटे, पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव, पंचायत समिती सदस्य नितीन भरगुडे-पाटील, गंरुदेव बरदाडे आदींसह ग्रामस्थांची बठक झाली. या वेळी स्मशनभूमीसाठी रस्ता मिळावा अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. त्यानंतर तहसीलदारांनी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची पाहणी केली. ग्रामस्थांशी झालेल्या चच्रेनंतर यावर पडदा पडला. गाडीतून मृतदेह गावात आणण्यात आला आणि नंतर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि प्रशासनाने सुस्कारा सोडला.