समोरच्या समाजातील करतात म्हणून आज आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठय़ा धुमधडाक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करीत आहेत. ही जयंती का करतो याचे आज आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन युथ स्वाभीमानी रिपब्लिकन चळवळीचे अध्यक्ष मनोज भाई संसारे यांनी ऐरोली येथील एका कार्यक्रमात केले.
आंबेडकरी चळवळीत सध्या हवशे, गवशे, नवशे, घुसले असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली.
ऐरोलीतील क्रांतीसूर्य प्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या वतीने महात्मा फुले, भारतरत्न डॉ. आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांची संयुक्त जंयती साजरी करण्यात आली. त्यावेळी संसारे यांनी दलित समजाचे कान टोचले. आज दलित समाजाच्या चळवळीत घसलेल्या हवशे गवशांना या चळवळीचे काहीही देणे घेणे राहिलेले नाही, असे ते म्हणाले.
 बाबासाहेबांच्या संघर्षांमुळे मिळालेल्या सवलतीने मोठे झालेले काही दलित बांधव आज आपली खरी ओळख लपवित असल्याचेही संसारे यांनी सांगितले.
 संस्थेचे अध्यक्ष विजय पाडले, सचिव निर्मलकुमार यांनी पुढील वर्षी आपण बाबासाहेबांना अभिप्रेत असणारे करियर गाईडन्सचे आयोजन करणार असल्याचे सांगितले.