गिनेज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी म्हणून शिर्डी येथे सुमारे दहा हजार भाविकांनी १ लाख दिवे प्रज्ज्वलीत करून विश्वविक्रमासाठी नोंद केली.
येथील साईभक्त लक्ष्मीबाई चॅरिटेबल ट्रस्टने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गिनेज बुक ऑफ रेकॉर्डबरोबरच लिम्का बुक ऑफ इंडिया, आशिया बुक यांनीही या ऐतिहासिक उपक्रमाची नोंद घेतली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सॅटेलाईट चित्रीकरण करण्यात आले असून त्याच्या पडताळणीनंतरच विश्वविक्रमाबाबत निर्णय घेतला जाईल.
साईनगरच्या मैदानावर मंगळवारी रात्री आडेआठ वाजता हा दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता. दिवे ठेवण्यासाठी स्टॅडची व्यवस्था करण्यात आली होती. या दिव्यांसाठी जवळपास अडिच हजार लिटर तेलाचा वापर करण्यात आला. सुमारे १० हजार भाविकांनी मेणबत्तीच्या सहाय्याने काही सेकंदात हे एक लाख दिवे प्रज्जलीत केले. यावेळी शिर्डीच्या नगराध्यक्षा सुमित्रा कोते, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, उपनगराध्यक्ष गोपीनाथ गोंदकर, डॉ. राजेंद्र पिपाडा यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमासाठी लक्ष्मीबाई ट्रस्टचे शैलजा गायकवाड, अरूण गायकवाड, संगीता गायकवाड, दत्ता आभाळे, चंदन सिन्हा,
सतीश औताडे आदींनी परिश्रम घेतले.