News Flash

तरुणाच्या हत्येनंतर तीन तासांत आरोपींना अटक

मालाडमध्ये किरकोळ वादातून सोमवारी रात्री एका तरुणाची हत्या करण्यात आली होती.

| August 19, 2015 12:58 pm

मालाडमध्ये किरकोळ वादातून सोमवारी रात्री एका तरुणाची हत्या करण्यात आली होती. बांगूर नगर पोलिसांनी कसलाही दुवा नसताना आरोपींना अवघ्या तीन तासांत अटक केली.मालाड गोरेगाव लिंक रोडवरील लक्ष्मी नगर येथे राहणाऱ्या महेश नायडू (३०) याची सोमवारी रात्री कुणीतरी लोखंडी सळईने मारहाण करून हत्या केली. त्याला उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच त्याचे निधन झाले होते.  मयत नायडू याचे काही दिवसांपूर्वी या भागातील एका गॅरेजवाल्याशी भांडण झाले होते. त्यादृष्टीने उमेश गिरी याची माहिती मिळाली.मात्र उमेश गिरी याचा मोबाइल बंद होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष भंडारे, पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे (गुन्हे) यांनी तात्काळ खबऱ्यांचे जाळे पसरवून आरोपींची माहिती मिळविली. आरोपी मुंबईबाहेर पळून जात असतानाच उमेश गिरी आणि त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2015 12:58 pm

Web Title: young man accused of killing arrest after three hours
Next Stories
1 दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी विशेष लॉटरी सोडतीची मागणी
2 चेंबूरच्या अयोध्यानगर शाळेची दुरवस्था
3 गेल्या काही वर्षांत १४ बलात्कार; ९३ जणांचा बुडून मृत्यू …
Just Now!
X