बार्शी येथे दोन महिलांच्या गळय़ातील दोन लाख रुपये किमतीचे आठ तोळे सोन्याचे दोन गंठण ‘धूम’ टोळीने हिसका मारून पळवून नेले. मोटारसायकलवरून भरधाव वेगात येऊन महिलांच्या गळय़ातील किमती दागिने लांबविण्याचे प्रकार वरचे वर वाढत असून हे लोण आता ग्रामीण भागातही पोहोचले आहे. बार्शी येथे कोठारे इमारतीसमोर मीना शहाजी पवार (वय ४०, रा. कसबा पेठ, बार्शी) या रस्त्यावरून पायी एकटय़ा चालत जात असताना दोघा अज्ञात चोरटय़ांनी काळय़ा रंगाच्या मोटारसायकलवरून येऊन त्यांच्या गळय़ातील चार तोळे वजनाचे दोन सोन्याचे गंठण हिसका मारून चोरून नेले. याशिवाय शीतल अभिमन्यू सातपुते (रा. ढगे मळा, बार्शी) यांच्या गळय़ातील चार तोळे वजनाचे सोन्याचे गंठण या‘धूम टोळीने हिसका मारून पळवून नेले. या गुन्हय़ाची नोंद बार्शी पोलीस ठाण्यात झाली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jan 2013 रोजी प्रकाशित
बार्शीत दोन महिलांना ‘धूम’ टोळीने लुटले
बार्शी येथे दोन महिलांच्या गळय़ातील दोन लाख रुपये किमतीचे आठ तोळे सोन्याचे दोन गंठण ‘धूम’ टोळीने हिसका मारून पळवून नेले. मोटारसायकलवरून भरधाव वेगात येऊन महिलांच्या गळय़ातील किमती दागिने लांबविण्याचे प्रकार वरचे वर वाढत असून हे लोण आता ग्रामीण भागातही पोहोचले आहे. बार्शी येथे कोठारे इमारतीसमोर मीना शहाजी पवार (वय ४०, रा. कसबा पेठ, बार्शी) या रस्त्यावरून पायी एकटय़ा चालत जात असताना दोघा अज्ञात चोरटय़ांनी काळय़ा रंगाच्या मोटारसायकलवरून येऊन त्यांच्या गळय़ातील चार तोळे वजनाचे दोन सोन्याचे गंठण हिसका मारून चोरून नेले.
First published on: 25-01-2013 at 08:06 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2 women robbed of dum style in barshi