अरविंद केजरीवालप्रणीत आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संस्थापक-सदस्य डॉ. गिरधर पाटील (जळगाव), गजानन खातू (मुंबई) व किरण उपकारे (अहमदनगर) ही श्रेष्ठ मंडळी येत्या शनिवारी, ५ जानेवारी रोजी सोलापूरच्या भेटीवर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक शनिवारी दुपारी तीन वाजता सरस्वती चौकातील पक्षाचे संस्थापक-सदस्य विद्याधर दोशी यांच्या ‘जीवनतारा’ बंगल्यात आयोजित करण्यात आली आहे. यावेळी पक्षश्रेष्ठींचे ‘राजकारणातून व्यवस्था परिवर्तन’ या विषयावर पक्षाची भूमिका स्पष्ट करणार आहेत. याचवेळी सोलापूर शहर व जिल्ह्य़ासह तालुका स्तरावरील पक्ष शाखा उभारण्यासाठी रूपरेषा निश्चित केली जाणार आहे. या बैठकीस पक्षात कार्य करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी परिचयपत्रासह उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक विद्याधर दोशी यांनी केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jan 2013 रोजी प्रकाशित
आम आदमी पार्टीचे श्रेष्ठी उद्या सोलापुरात
अरविंद केजरीवालप्रणीत आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संस्थापक-सदस्य डॉ. गिरधर पाटील (जळगाव), गजानन खातू (मुंबई) व किरण उपकारे (अहमदनगर) ही श्रेष्ठ मंडळी येत्या शनिवारी, ५ जानेवारी रोजी सोलापूरच्या भेटीवर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक शनिवारी दुपारी तीन वाजता सरस्वती चौकातील पक्षाचे संस्थापक-सदस्य विद्याधर दोशी यांच्या ‘जीवनतारा’ बंगल्यात आयोजित करण्यात आली आहे.
First published on: 03-01-2013 at 08:52 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aam aadmi party leaders tomorrow in solapur