राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी येथील आदिवासी विकास विभाग संचालित एकलव्य रेसिडेन्सीयल स्कूलमधील अंकुश कांडय़ा पावरा या खेळाडूची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. जालना येथे झालेल्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत १७ वर्षांखालील गटात अंकुशने ८०० मीटर धावणे प्रकारात नेत्रदीपक कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळविला. विशेष म्हणजे, एकलव्यच्या १५ खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन केल्याने त्यांची विभागीय स्तरावर निवड झाली होती. त्यात सहा मुलींचा समावेश होता. पावरा याची राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली असून स्पर्धेपूर्वी विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याच्या निवडीबद्दल आदिवासी विकास आयुक्त संभाजी सुरकुंडे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी अप्पर आयुक्त सु. भा. हिंगोणेकर, पल्लवी दराडे (नागपूर), सुधीर पाटील (ठाणे), जिल्हा क्रीडा अधिकारी सुधीर मोरे, प्राचार्य अशोक बच्छाव आदी उपस्थित होते.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ankush pawar get selected for competition
First published on: 30-11-2012 at 12:14 IST