येथील गुरू गोविंदसिंग पब्लिक स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी व डॉ. पल्लवी धर्माधिकारी हे उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध स्पर्धा, परीक्षा व खेळात नैपुण्य दाखविलेल्या मुलांना रोख स्वरूपात बक्षीस देण्यात आले. डॉक्टरांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांसाठी अभ्यास व खेळाबरोबरच आरोग्याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष गुरुदेवसिंग बिर्दी, सचिव बलजितसिंग छाबरा, उपाध्यक्ष हरजीतसिंग आनंद आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्राचार्य जयश्री सावंत, गुरुचरणकौर कोहली, पर्यवेक्षिका शोभा करवा, दिलीप करवा आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन वैष्णवी अहिरे, मृणाल चौधरी यांनी केले. आभार शोभा करवा यांनी मानले.