सिंहस्थाच्या पाश्र्वभूमीवर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरूच ठेवली आहे. त्याअंतर्गत मंगळवारी सकाळी गंगापूर रस्त्यावरील एस.टी. कॉलनी परिसरातील बेकायदेशीर व अनधिकृत अतिक्रमणांवर अतिक्रमण विभागाने हातोडा चालविला.
दोन महिन्यांपूर्वी गंगापूर रस्त्यावरील आनंदवली, जेहान सर्कल, विद्या सर्कल परिसरातील बेकायदेशीर व अनधिकृत अतिक्रमणांवर हातोडा फिरवण्यात आला. यामध्ये हॉटेल्स, दुकानांचे शेड, ओटे आदी हटविण्यात आले.
इतर भागांतील प्रमुख रस्त्यांना अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढण्यात आली. मंगळवारी या विभागाने आपला मोर्चा पुन्हा एस.टी. कॉलनी परिसराकडे वळविला. या परिसरातील अनधिकृत व बेकायदेशीर अतिक्रमण काढण्यात आले. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई सुरू करण्यात आली. सकाळच्या सत्रात मोहीम राबविल्याने काही वेळासाठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anti encroachment action taken st colony in nashik
First published on: 20-05-2015 at 08:12 IST