निर्मलनगर पोलिसांनी एका हत्येप्रकरणात माजी सहाय्यक पोलीस आयुक्ताच्या मुलाला अटक केली आहे. मयुरेश शिंदे असे त्याचे नाव आहे.
निर्मलनगरच्या म्हाडा कॉलनी शेजारील पाण्याच्या टाकीवर १ जानेवारी रोजी जब्बार शेख (४२) याचा मृतदेह पोलिसांना आढळला होता. पोलिसांनी या हत्येप्रकरणी मयुरेश शिंदे याला अटक केली आहे. मयुरेश माजी सहाय्यक पोलीस आयुक्त सुदाम िशदे यांचा मुलगा आहे.
त्याच्यावर निर्मलनगर पोलीस ठाण्यात यापूर्वीही गुन्ह्य़ाची नोंद आहे. १ जानेवारी रोजी मयुरेश पाण्याच्या टाकीवर झोपायला गेला होता. तेव्हा त्याचा जब्बारबरोबर झोपण्याच्या जागेवरून वाद झाला. त्यातून झालेल्या भांडणातून मयुरेशने पेव्हर ब्लॉक टाकून जब्बारची हत्या केली.
या घटनेनंतर मयुरेश सोलापूरला पळून गेला होता. या हत्येमागे मयुरेशचा संबंध असल्याचे समजताच पोलीस सोलापूरला गेले. तेथूनही त्याने पळ काढला होता. तो पुन्हा सोलापूरला येताच पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला ७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मयुरेशची निर्मलनगर भागात दहशत होती. त्याच्यावर खुद्द वडिलांच्या कार्यालयातच चोरी केल्याच्या गुन्ह्य़ाची नोंद आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jan 2013 रोजी प्रकाशित
माजी सहाय्यक पोलीस आयुक्ताच्या मुलाला हत्येप्रकरणी अटक
निर्मलनगर पोलिसांनी एका हत्येप्रकरणात माजी सहाय्यक पोलीस आयुक्ताच्या मुलाला अटक केली आहे. मयुरेश शिंदे असे त्याचे नाव आहे. निर्मलनगरच्या म्हाडा कॉलनी शेजारील पाण्याच्या टाकीवर १ जानेवारी रोजी जब्बार शेख (४२) याचा मृतदेह पोलिसांना आढळला होता. पोलिसांनी या हत्येप्रकरणी मयुरेश शिंदे याला अटक केली आहे. मयुरेश माजी सहाय्यक पोलीस आयुक्त सुदाम िशदे यांचा मुलगा आहे.
First published on: 10-01-2013 at 01:35 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrest to police officer son for murdered case