‘बेस्ट’च्या बसमधून फुकट प्रवास करणाऱ्या तसेच कमी अंतराचे तिकीट काढून दूरचा प्रवास करणाऱ्यांकडून सुमारे १७ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.  बेस्टच्या बसमधून फुकट प्रवास करणाऱ्या तसेच कमी अंतराचे तिकीट काढून जास्त प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने ऑक्टोबर, नोव्हेंर आणि डिसेंबर २०१२ या तीन महिन्यांमध्ये फुकटय़ा प्रवाशांविरुद्ध विशेष मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत २८,३३५ जणांची धरपकड करण्यात आली. त्यांच्याकडून तब्बल १७,१३,१४९ रुपये दंड वसूल करण्यात आला.
विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून प्रवास भाडे अधिक भाडय़ाच्या दहापट रक्कम वसूल केली जाते. मात्र ही रक्कम न भरणाऱ्या प्रवाशांस एक महिना पोलीस कोठडी किंवा २०० रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षा एकत्रितपणे ठोठावण्याची तरतूद आहे.