‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या बिरूदाप्रमाणे तत्पर सेवा देण्यासाठी आणि त्याचबरोबर सामान्यांच्या मनातील पोलिसांची भीती नाहीशी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने संकेतस्थळ सुरू केले आहे. डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट भंडारापोलीस डॉट ओआरजी  या संकेतस्थळावर आता घरूनच जिल्ह्य़ातील कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविता येऊ शकते.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट भंडारापोलीस डॉट ओआरजी हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. पोलिसांची सेवा चांगली व तत्पर करणे, तसेच समाजाचा सहभाग पोलिसांच्या कामात वाढविणे हे संकेतस्थ सरिू करण्यामागील उद्देश असल्याचे डॉ. आरती सिंह यांनी सांगितले. या संकेतस्थळावर व्यक्ती हरवल्याची, वाहनचोरी गेल्याची, तसेच विनयभंग, बलात्कार आदी तक्रारी ऑनलाइन नोंदवता येतात.
एखादा अनोळखी मम्ृतदेह पोलिसांना सापडला तर त्याची माहिती पोलीस वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध करतात. आता अशा व्यक्तीची माहिती या संकेतस्थळावरसुद्धा प्रसिद्ध करण्यात येईल, तसेच फरार आरोपींची माहिती अर्जाची सद्यस्थितीतही संकेतस्थळावर पाहता येईल. त्यासोबतच नवीन कायद्यांची व पोलिसांच्या वतीने सुरू करण्यात येणारे नवीन उपक्रम, योजनांची माहितीही यावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्य़ातील सर्व पोलीस ठाण्यांचे दूरध्वनी क्रमांक, अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक, ई-मेल, पत्ता, संबंधित अधिकाऱ्यांची नावे आणि हेल्पलाईन नंबरसुद्धा या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
अनेकदा आपल्या आजूबाजूला काही समाजविघातक बाबी घडत असतात. त्याची माहिती बऱ्याचदा शेजाऱ्यांना आणि त्या भागातील नागरिकांना असते; परंतु ओळख उघड होण्याच्या भीतीमुळे नागरिक ती माहिती पोलिसांना देत नाहीत, पण आता वेबसाईटच्या माध्यमातून सामान्य नागरिक अशी माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवू शकतात.
यात पोलीस ठाण्यात जाऊन स्वत: ची ओळख देऊन माहिती देण्याची गरज नसल्यामुळे नागरिक बिनधास्तपणे अशा समाजविघातक कृत्याची माहिती देऊ शकतात. याचा फायदा पोलिसांना समाजविघातक घडामोडी आटोक्यात आणून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी होईल, तसेच पोलिसांच्या सेवेत काय सुधारणा करायला पाहिजे त्याचा फिडबॅकसुद्धा या संकेतस्थळावर सामान्य नागरिकांना देता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhandara police superintendent office become high tech
First published on: 19-02-2013 at 04:04 IST