राजमाता जिजाऊ यांच्या ४१५ व्या जयंतीनिमित्त शनिवारी शहरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लाल महाल येथील जिजाऊ यांच्या पुतळ्याला माँ जिजाऊ प्रतिष्ठान, अखिल भारतीय युवक मराठा महासंघातर्फे प्रदेशाध्यक्ष संतोष नानवटे आणि पुणे महानगरपालिकेचे सहायुक्त ज्ञानेश्वर मोळक तर शिवसंग्राम संघटनेचे शहराध्यक्ष भरत लाड यांनी पुष्पहार अर्पण केला.
छावा युवा संघटनेतर्फे कार्यालयात आणि परिसरामध्ये पेढय़ांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर छावा दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. मावळा जवान संघटनेतर्फे राजगडाच्या पायथ्याजवळील सिद्धेश्वर मावळा तीर्थावर उभारण्यात आलेल्या जिजाऊ आणि शिवाजी महाराज स्मारकाचे मावळी रिवाजात लोकार्पण करण्यात आले. तसेच संघटनेतर्फे कर्तबगार महिलांना ‘जिजाऊ गौरव’ पुरस्कार देण्यात आला. तसेच ‘मावळा गौरव’ आणि ‘छत्रपती शंभुराजे ज्ञानसेवा’ पुरस्कारांचे वितरणही यावेळी झाले. जिजाऊ व्याख्यानमालेत श्रीमंत कोकाटे, दादासाहेब कोरेकर आणि भानुदास गायकवाड यांची व्याख्याने झाली.
संग्रहित लेख, दिनांक 13th Jan 2013 रोजी प्रकाशित
जिजाऊंची जयंती पुण्यात विविध कार्यक्रमांनी साजरी
राजमाता जिजाऊ यांच्या ४१५ व्या जयंतीनिमित्त शनिवारी शहरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लाल महाल येथील जिजाऊ यांच्या पुतळ्याला माँ जिजाऊ प्रतिष्ठान, अखिल भारतीय युवक मराठा महासंघातर्फे प्रदेशाध्यक्ष संतोष नानवटे आणि पुणे महानगरपालिकेचे सहायुक्त ज्ञानेश्वर मोळक तर शिवसंग्राम संघटनेचे शहराध्यक्ष भरत लाड यांनी पुष्पहार अर्पण केला.
First published on: 13-01-2013 at 02:11 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Birth anniversary of jijau is celebrated in pune