शौर्यपदक मिळालेल्या राज्यातील २४ पोलीस कर्मचाऱ्यांचा भव्य सत्कार येत्या ६ मे रोजी करण्यात येणार आहे. स्लीपलेस नाइट या संस्थेतर्फे त्यांना ‘आय प्राईड’ पुरस्कार  देऊन गौरविण्यात येणार आहे. बॉलीवूड, कॉर्पोरेट आणि पोलीस दलातील अधिकाऱ्यांतर्फे हा सन्मान केला जाणार आहे.
२०१४ या वर्षांत राज्यातील २६ पोलीस कर्मचऱ्यांना राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक आणि पोलीस शौर्यपदकांनी सन्मानित करण्यात आले होते. मात्र या कर्तृत्ववान पोलिसांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नव्हती. त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करून त्यांच्या धाडसाला सलाम करण्यासाठी स्लिपलेस नाइट या संस्थेने पुढाकार घेतला आहे. येत्या ६ मे रोजी २०१४ वर्षांत पोलीस शौर्यपदक मिळालेल्या सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा भव्य सत्कार केला जाणार आहे. त्यांना आय प्राईड हा सन्मान प्रदान केला जाणार आहे. अंधेरीच्या शहाजी राजे क्रीडा संकुलात होणाऱ्या या भव्य कार्यक्रमात बॉलीवूड आणि उद्योग जगतालील प्रमुख उपस्थित राहणार आहेत. आतापर्यंतचा हा पहिला प्रयत्न आहे. आमच्याकडे ही संस्था आली आणि आम्ही त्यांना असा कार्यक्रम करण्याची परवानगी दिल्याची माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक संदीप भाजीभाकरे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brave police get i pride award
First published on: 11-04-2015 at 12:01 IST