शहर परिसरातील विविध सामाजिक संस्था, संघटना तसेच राजकीय पक्ष यांच्यातर्फे भगवान गौतम बुद्धांच्या जयंतीचे औचित्य साधत सोमवारी धम्म फेरीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. बुद्ध पौर्णिमेनिमित्त पाथर्डी फाटा येथील स्मारकाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. दिवसभरात हजारो भाविकांनी स्मारकात हजेरी लावत अभिवादन केले.
नाशिक जिल्हा नशाबंदी मंचच्यावतीने पाथर्डी फाटा येथील त्रिरश्मी लेणी येथे खिरदान वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी महापौर अशोक दिवे तर प्रमुख पाहुणे म्हणून अविनाश आहेर, कुसुम चव्हाण आदी उपस्थित होते. तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे विचार आजही जगाच्या कानाकोपऱ्यात वंदनीय व पूजनीय आहे. त्यांच्या विचारांची शिदोरी मानवाचे कल्याण करणारी असल्याचे दिवे यांनी सांगितले. मंचच्यावतीने व्यसनाचे दुष्परिणाम दर्शविणारे पत्रके वितरित करण्यात आली. व्यसनाबद्दलच्या शंका व प्रश्नांना डॉ. श्याम दुसाने यांनी उत्तरे दिली. यावेळी गौतम बुध्द यांच्या जयंती उत्सवानिमित्त बांधवानी शुभ्रवस्त्र परिधान करून सामूहिक प्रार्थना केली. उपस्थितांना प्रसाद म्हणून खिरीचे वाटप करण्यात आले. वंदना उन्हवणे यांनी प्रास्ताविक केले. सूर्यकांत आहेर यांनी सूत्रसंचालन केले. पेठ रोड मार्गावरील मेहेरधाम येथे बुद्ध जयंती उत्सव समितीच्यावतीने पहाटे ‘बौद्ध पहाट’ व सायंकाळी धम्म रॅली व रात्री माजी पोलीस अधीक्षक डॉ. संजय अपरांती यांचे ‘बुद्ध विचारांची स्पर्धा परिक्षेसाठी आवश्यकता’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते गौतम बुद्धांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.

_india social group wealth
भारतीय मुस्लिमांकडे किती संपत्ती? इतर धर्मीयांची काय स्थिती?
lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार