गेवराईजवळ बस-जीपची धडक

बस व जीपची समोरासमोर धडक होऊन औरंगाबाद येथील तीनजण ठार, तर सातजण जखमी झाले. रविवारी रात्री नऊच्या सुमारास बीड-औरंगाबाद मार्गावर गेवराईजवळ बाग िपपळगाव येथे हा अपघात घडला.

बस व जीपची समोरासमोर धडक होऊन औरंगाबाद येथील तीनजण ठार, तर सातजण जखमी झाले. रविवारी रात्री नऊच्या सुमारास बीड-औरंगाबाद मार्गावर गेवराईजवळ बाग िपपळगाव येथे हा अपघात घडला.
औरंगाबादहून बीडकडे येणारी बस (एमएच २० डीएल २६८५) व बीडहून औरंगाबादला जाणारी जीप (एमएच ४ बीए २०२७) या गाडय़ांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात जीप रस्त्याच्या बाजूला काही अंतरावर खड्डय़ात पडली. जीपमधील राजेंद्र शिवाजी देशमुख (वय ५०), राजेश्री राजेंद्र देशमुख (वय ४५, औरंगाबाद) व सरोजिनी कुलकर्णी (वय ७०, औरंगाबाद) हे तिघे जागीच ठार झाले. जीपचालक सुनील मनोहर चव्हाण (लाहुरी, तालुका कंधार) याच्यासह माया देशमुख, पृथ्वीराज, अतुल कुलकर्णी, पायल राजेंद्र देशमुख (औरंगाबाद) व बसमधील दिगांबर सखाराम खोबरे (बीड) जखमी झाले. अपघातानंतर जवळच्या प्रवाशांनी व बसमधील काही लोकांनी जखमींना बाहेर काढण्यास प्रयत्न केले. माहिती मिळताच गेवराईचे आमदार बदामराव पंडित यांच्यासह कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bus jeep bump near gevrai