शिक्षकांबद्दलचा आदर कमी झाल्याचे चित्र सर्वत्रच दिसते आहे. मुलांना चांगले संस्कार कसे द्यायचे, हेच आपणासमोरचे आव्हान आहे. या आव्हानांना कसे तोंड देतो यावरच भविष्य अवलंबून आहे. या पिढीमध्ये सकारात्मक विचार रुजवण्याची गरज आहे. तरुणांची पिढी विचाराने सक्षम असेल तरच राष्ट्र सक्षम होईल, असे मत गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व कर्मचारी सहकारी पतपेढीतर्फे शाहू स्मारक भवनाच्या सभागृहात गुणवंत पाल्य, सेवानिवृत्त, सभासद सत्कार आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर जयश्री सोनवणे होत्या.
स्वागत व प्रास्ताविक चेअरमन रघुनाथ पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय संचालक विलास साठे यांनी करून दिला. आभार व्हा. चेअरमन मिसाळ यांनी मानले.
सूत्रसंचालन सुरभी जाधव, सोमनाथ जाधव यांनी केले. या समारंभास संचालक महादेव चौगले, सर्जेराव जरग, सुनील ठाणेकर, दिलीप चोपडे, सुप्रिया िशदे, शिवाजी नाळे, प्र-व्यवस्थापक अशोक भोसले, रघुनाथ पाटील यांच्यासह सभासद उपस्थित होते.