युनियन बँकेच्या स्टेशन रस्ता शाखेने माहितीच्या अधिकाराचा भंग केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र शिंदे यांनी बँकेचे विभागीय व्यवस्थापक व केंद्रीय माहिती आयुक्त यांच्याकडे केली आहे. माहिती अधिकार कायद्याची बँकेतील अधिकाऱ्यांना माहिती नसल्याने माहिती अधिकारीच अपील निकाली काढत असल्याचे शिंदे यांचे म्हणणे आहे.
बँकेत नवे खाते सुरू करण्यासंबधी शिंदे यांना बँक अधिकाऱ्यांचा वाईट अनुभव आला. रिझव्र्ह बँकेच्या नियमानुसार नवे खाते सुरू करण्यासाठी एक ओळखपत्र व रहिवासाचा पुरावा म्हणून मतदान कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना यापैकी काहीही एक पुरेसे असते. तरीही बँक अधिकारी १०० रुपयांच्या मुद्रांकावर रहिवासाबाबतचे प्रमाणपत्र तसेच मी गुन्हेगारी अथवा दहशतवादी कृत्यांसाठी या खात्याचा वापर करणार नाही असे लिहून मागतात.
याबाबत बँकेंच्या शाखा व्यवस्थापकांकडे तक्रार केली असता त्यांनी उर्मट उत्तरे दिली. आमचे समाधान झाल्याशिवाय तुमचे खाते सुरू होणार नाही, आमचे नियम महत्वाचे आहेत असे त्यांनी सांगितले. नवे खाते सुरू करण्याबाबतची नियमावली मागितली असता ती दिली नाही. त्यामुळे माहितीच्या अधिकारात अर्ज केला. नियमाप्रमाणे त्याचे ३० दिवसात उत्तर मिळणे अपेक्षित होते. ते मिळाले नाही म्हणून अपिलीय अधिकाऱ्यांकडे अपील केले. मात्र अधिकार नसताना हा अर्ज माहिती अधिकाऱ्यांनीच निकाली काढला. त्याबाबत विचारणा केली असता पुन्हा उर्मट उत्तरे मिळाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Complaint against violation of right to information by union bank
First published on: 21-04-2013 at 01:47 IST