जिल्हा परिषद आणि महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे, याकरिता सर्वशिक्षा अभियानांतर्गत शाळांमध्ये संगणक उपलब्ध करून देण्यात आले असताना जिल्ह्य़ातील २२० शाळांमध्ये संगणक शिक्षक नाहीत तर चारशेपेक्षा अधिक ठिकाणी संगणक नादुरस्त होऊन धूळखात पडले आहेत. एकीकडे विद्यार्थ्यांना संगणकांची माहिती व्हावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कोटय़वधी रुपये खर्च करीत असताना शालेय शिक्षण विभाग काय करतो? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विदर्भातील महापालिका आणि जिल्हा परिषद शहर आणि ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे यासाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत संगणक उपलब्ध करुन देण्यात आले असताना नागपूर जिल्ह्य़ातील २०० च्या जवळपास शाळांमध्ये संगणक शिक्षक नसल्यामुळे त्याचा उपयोग शाळेच्या कामकाजासाठी केला जात आहे तर काही शाळांमध्ये संगणक नादुरस्त असल्यामुळे ते धूळखात पडले आहे. सर्वशिक्षा अभियानातंर्गत शाळांमध्ये विविध सोयी युविधा निर्माण करून दिल्या जात असताना त्याचा उपयोग होत नसल्याचे दिसत आहे.
अनेक शाळांमध्ये संगणक आहेत, पण ते वापरात नाहीत. कन्हानजवळच्या पिपरी येथे पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा असून शाळेला तीन वर्षांपूर्वी संगणक मिळाले. मात्र, अजूनही त्या संगणकांचा उपयोग करण्यात आलेला नाही. शहरात महापालिकेच्या दीडशेपेक्षा अधिक शाळा असताना ४५ शाळांमध्ये संगणक शिक्षक नाहीत.  महापालिकेच्या अनेक शाळा आज बंद झाल्या असून त्या शाळेतील संगणक कुठे गेले? याची माहिती शिक्षण विभागाकडे नाही. एकीकडे महापालिका शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक असताना संगणकाचे अध्यापन करणारे शिक्षक नसल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्यावर्षी जिल्हा परिषदेच्या जिल्ह्य़ातील १७५ शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणे सुरू करण्यात आला होता. मात्र, हा शंभरपेक्षा अधिक शाळांमध्ये तो बंद झाला आहे. संगणक प्रयोगशाळा उपक्रमाला सुरुवातीच्या दिवसात चांगला प्रतिसाद मिळला मात्र शिक्षण विभागाच्या उदासीनतेमुळे त्याचे प्रमाण कमी झाले आहे. जिल्ह्य़ामध्ये लहान लहान गावांमध्यें  विद्यार्थ्यांंच्या उपयोगासाठी देण्यात आलेल्या संगणकाचा उपयोग शाळेने कार्यालयीन कामासाठी सुरू करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांंना त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचे एका शिक्षकाने सांगितले. ही परिस्थिती शहरातील काही शाळांमध्ये आहे.
या संदर्भात शिक्षण उपसंचालक पारधी यांना विचारणा केली असता त्यांनी या संदर्भात माध्यमिक आणि प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांना विचारून माहिती घेणार असल्याचे सांगितले.

Five times increase in admission fee in private AYUSH colleges
खासगी आयुष महाविद्यालयांमधील प्रवेश शुल्कात पाच पट वाढ
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Maharashtra Medical Council, Maharashtra Medical Council Introduces QR Codes, Combat Bogus Doctors, combat bogus doctors new technology of QR Codes, marathi news, Maharashtra news, doctors, loksatta news,
नागपूर: आरोग्य विद्यापीठाकडून डॉक्टरांना कौशल्य विकासासाठी ‘डीएचएफसी’सक्ती
tribal student now get education in dialect conversion
आदिवासी विद्यार्थ्यांना आता बोलीभाषेत शिक्षण, चौथीपर्यंतच्या क्रमिक पुस्तकांचे १२ स्थानिक भाषांमध्ये रूपांतर
Teachers Day Special Students become teachers of students Where is this unique school
शिक्षक दिन विशेष : विद्यार्थीच झाले विद्यार्थ्यांचे शिक्षक… कुठे आहे ही अनोखी शाळा?
nagpur medical college fourth class recruitment Online Exam
नागपूर : चतुर्थश्रेणी कर्मचारी पदभरतीच्या ऑनलाईन परीक्षेत गोंधळ; उमेदवार परीक्षेला मुकले
mbbs students will now also have to study moral values education
एमबीबीसच्या विद्यार्थ्यांना आता ‘याचा’ही अभ्यास करावा लागणार, मिळणार विशेष गुण
Nagpur, Music Teacher, nagpur school teacher beating srudent, Student Beating, Complaint, Education Officer, Deputy Chief Minister, School Education Minister,
शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण, कायदा काय सांगतो?