सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीतील साईडपट्टय़ा विकसित करणे व भुयारी गटार योजना, हे प्रलंबित असलेले प्रश्न अखेर निकाली लागले असून नाशिक इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा)तर्फे साईडपट्टय़ा हस्तांतरित करण्यासंदर्भातील लेखी पत्र बुधवारी महापालिकेला देण्यात आले.
रस्त्यांसह साईडपट्टय़ा विकसित करण्याविषयी महापालिका व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. मात्र, या साईडपट्टय़ा कोणी विकसित करावयाच्या व भुयारी गटार योजना कोणी राबवायची, याविषयी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व महापालिका एकमेकांकडे अंगुलीनिर्देश करीत होते. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने औद्योगिक वसाहतीतील रस्ते व साईडपट्टय़ा विकसित करण्यासाठी व भुयारी गटारी योजना राबविण्याबाबत पालिकेस लेखी स्वरूपात पत्र द्यावे, अशी भूमिका पालिकेने घेतली होती. अखेर निमाच्या पुढाकाराने बुधवारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी रामदास खेडकर यांच्या उपस्थितीत अध्यक्ष धनंजय बेळे, नगरसेवक दिनकर पाटील, मनपा अधिकारी गांगुर्डे यांची बैठक झाली. बैठकीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने औद्योगिक वसाहतीतील साईडपट्टय़ा महापालिकेस हस्तांतरित करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पालिका आयुक्तांना लेखी पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीतील रस्ते रुंदीकरण, रस्त्यांची देखभाल, साईडपट्टय़ा विकसित करणे, भुयारी गटारी योजना आदी रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Nov 2012 रोजी प्रकाशित
औद्योगिक वसाहतीतील साईडपट्टय़ा पालिकेकडे वर्ग
सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीतील साईडपट्टय़ा विकसित करणे व भुयारी गटार योजना, हे प्रलंबित असलेले प्रश्न अखेर निकाली लागले असून नाशिक इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा)तर्फे साईडपट्टय़ा हस्तांतरित करण्यासंदर्भातील लेखी पत्र बुधवारी महापालिकेला देण्यात आले.
First published on: 22-11-2012 at 08:51 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corporation classes for border of industrial colony