सध्या सुरू असलेल्या चॅम्पियन लीग टी-२० स्पर्धेतील एका सामन्यावर सट्टा लावणाऱ्या येथील चार संशयितांना गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी रात्री अटक केली. छाप्यात जुगाराच्या साहित्यासह एक लाख १७ हजार ८०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला
उपनगर परिसरातील आंबेडकरनगर येथील पार्क सोसायटीत राहणारे खेमचंद छत्ताराम सिरामनानी यांच्या घरी क्रिकेट सामन्यावर सट्टा लावण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मंगळवारी चॅम्पियन लीग टी-२० स्पर्धेत कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध डॉल्फिन हा सामना सुरू असताना पोलिसांनी सिरामनानी यांच्या घरी छापा टाकला. छाप्यात राजस्थान येथील अनुपकुमार मंगलचंद शर्मा (४२), जळगाव येथील राजेंद्र श्रीराम पाटील (३१), कोल्हापूर येथील कैलास टेकचंद केवलरमानी (३३) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे १६ विविध कंपन्यांचे भ्रमणध्वनी, तीन लॅपटॉप, टीव्ही संच यांसह काही इलेक्ट्रानिक उपकरणे, सहा कागदपत्रे, सट्टा लावणाऱ्यांची यादी असा एकूण १,१७,८०० रुपयांचा ऐवज आढळून आला. गुन्हे शाखेचे साहाय्यक निरीक्षक गंधार देवडे यांच्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricket betting racket busted four arrested
First published on: 02-10-2014 at 12:33 IST