येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात काल शुक्रवारी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास अज्ञात तरूणांच्या गोळीबारात गंभीर जखमी झालेला कुख्यात गुंड सलिम शेख ऊर्फ सल्या चेप्या यास काल रात्री मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तो औषधांना प्रतिसाद देत असून, लवकरच त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याचे कराड विभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे यांनी सांगितले.
सल्या चेप्या याच्या उजव्या हाताला एक गोळी लागली तर, एक गोळी मणक्याला भेदून ह्रदयाजवळ स्थिरावली आहे. त्यामुळे ही गोळी काढण्याची शस्त्रक्रिया अवघड असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, या गोळीबारात जखमी झालेले महादेव बाळू गुजले व प्रशांत सुरेश दुपटे या नागरिकांची प्रकृती सुधारत आहे.
दरम्यान, या गोळीबार प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांची तीन पथके कार्यरत आहेत. मात्र, ठोस अशी माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नसून, मारेकऱ्यांना कोणी ओळखत असेल, त्यांच्या गाडय़ांच्या नंबरची माहिती असेल तर, त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांना माहिती कळवावी. माहिती देणाऱ्याचे नाव जाहीर करण्यात येणार नसल्याचे बी. आर. पाटील यांनी सांगितले आहे. या गोळीबार प्रकरणाचा तपास सर्वत्या शक्यता व संशय पडताळून करण्यात येत आहेत.
खून, प्राणघातक हल्ले, मारामाऱ्या, खंडणी अशा गंभीर गुन्ह्यात बहुचर्चित सलिम शेख हा महाराष्ट्र केसरी पहिलवान संजय पाटील खून प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून पोलिसांच्या तपासात समोर आला होता. सलिम शेख याच्यावर यापूर्वीही अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात गोळीबार झाला होता. या हल्ल्यातील संशयितांना पकडण्यात पोलिसांना यश आले होते. तर, न्यायालयीन कोठडीत असताना, आणि सातारच्या शासकीय रूग्णालयात उपचार घेत असताना, तो ज्या खोलीत उपचार घेत होता त्या खोलीवरही गोळीबार झाला होता. यानंतर काल झालेला हा सल्यावरील तिसरा प्राणघातक हल्ला आहे. गेल्या २५ वर्षांत सल्यावर सातारा, सांगली जिल्ह्यासह ठिकठिकाणी खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत.

man was stabbed to death in a fight between two groups in nagpur
नागपुरातली गुन्हेगारी थांबेना… आता दोन गटांच्या भांडणात एकाची भोसकून हत्या…
Mumbai, Two arrested,
मुंबई : वृद्धाचे सोने लुटणाऱ्या दोघांना अटक
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
Two Drunk Policemen, Vandalize Hotel, Assault Owner, hudkeshwar police station, crime, marathi news,
मद्यधुंद पोलिसांची भोजनालयात तोडफोड, चित्रफीत प्रसारित झाल्याने खळबळ