डेंग्यूच्या साथीबद्दल माहिती देणारया जाहिराती व वृत्तांमधून लोकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीचा उपयोग करून हमखास उपचाराच्या नावाखाली काही डॉक्टर तसेच नìसग होममध्ये रुग्णांकडून बक्कळ पसेही उकळले जात आहेत. डेंग्यू हा विषाणूजन्य आजार असून त्याच्यावर उपचार नाहीत. सकस आहार, भरपूर पाणी व विश्रांती यासोबत लक्षणांवर उपाय केल्यावर रुग्ण बरा होतो. मात्र डेंग्यू या नावाने उपचारांचे पॅकेज देणाऱ्या डॉक्टर तसेच नìसग होमपासून सावध राहण्याचा सल्ला पालिकेच्या आरोग्य अधिकारयांनी दिला आहे.
गेल्या महिन्याभरात डेंग्यू आजाराची साथ अधिक पसरली आहे. स्वच्छ पाण्यात होत असलेल्या एडिस इजिप्ती या डासामार्फत डेंग्यूचे विषाणू पसरतात. पावसाळ्यानंतर कमी अधिक होत असलेल्या तापमानामुळे या विषाणूंना पोषक वातावरण मिळाले आहे. लोकांना आता डेंग्यूच्या साथीबाबत माहिती समजली आहे. त्यामुळे काही वेळा डेंग्यूची लक्षणे नसली तरी जोखीम नको म्हणून रुग्णच डेंग्यूची चाचणी करण्याचा आग्रह धरतात. ती नकारात्मक आली की त्यांना हायसे वाटते, अशी माहिती डॉ. जयेश लेले यांनी दिली.
डेंग्यूच्या भीतीमुळे अशी एखादी चाचणी करण्यापर्यंत ठीक आहे. मात्र डेंग्यूमुळे शरीरातील कमी होणाऱ्या प्लेटलेट्सची भीती दाखवून पॅकेज देणारी नìसग होमदेखील मुंबईत असल्याची माहिती एका डॉक्टरांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. ‘या पावसाळ्यात माझ्याकडे डेंग्यूचे ३८ रुग्ण आले. त्यातील केवळ दोन रुग्णांना प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यामुळे एक दिवस रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवावे लागले. मात्र इतर रुग्ण लक्षणांवरील उपचार तसेच योग्य आहार, द्रवपदार्थ व विश्रांती यांनी बरे झाले. त्यामुळे डेंग्यूबाबत अकारण भीती बाळगण्याची गरज नाही,’ असे डॉ. सुहास िपगळे म्हणाले.
डेंग्यू आणि मलेरिया, डेंग्यू आणि लेप्टो तसेच मलेरिया आणि लेप्टो अशा दोन आजारांची एकाच वेळी लागण होऊन काही वेळा गुंतागुंत निर्माण होते. डेंग्यू विषाणूचे चार प्रकार असून मुंबईत सामान्यत दुसरया प्रकारतील विषाणुंचा अधिक प्रादुर्भाव होतो. काही वेळा अंतर्गत रक्तस्राव होऊन अवयव निकामी होत जातात. मात्र अशा प्रकारच्या घटनांचे प्रमाण कमी आहे. ‘डेंग्यू हा विषाणूंमुळे पसरणारा आजार असून त्याच्यावर उपचार नाहीत. विषाणूजन्य आजार स्वनियंत्रित असतात. योग्य आहार, दिवसाला दोन ते तीन लिटर द्रवपदार्थ व विश्रांती घेतल्यास तीन ते चार दिवसात हा आजार नियंत्रणात येतो. पालिका रुग्णालयात डेंग्यूच्या रुग्णांवर या पद्धतीने उपचार होतात व बहुतांश रुग्ण कोणतीही गुंतागुंत न होता बरे होतात’, अशी माहिती पालिकेच्या प्रमुख रुग्णालयाच्या संचालिका डॉ. सुहासिनी नागदा यांनी दिली.
पावसाळ्यानंतर तापमानात होत जाणारया चढउतारांमुळे दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूची साथ पसरते. मात्र गारवा सुरू झाला की ही साथ आटोक्यात येते, अशी माहितीही त्यांनी दिली.