बहुतेक विद्यार्थ्यांना अवघड आणि कठीण वाटणारा क्रमिक अभ्यासक्रमातला गणित विषय सोपा करून शिकविण्याची अभिनव पद्धत डोंबिवलीतील एक ज्येष्ठ नागरिक आनंदकुमार गोरे यांनी शोधली आहे.  आनंदकुमार यांची आई ठाण्याच्या मो. ह. विद्यालयात शिक्षिका तर वडिल रेल्वेत होते. आई-वडिलांकडून आपल्यावर गणिताचे चांगले संस्कार झाले असे मानणाऱ्या आनंदकुमार यांनी कॅनरा बँकेतून १९९० मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर नव्या पिढीवर हे संस्कार करण्यास सुरुवात केली. त्यासाठी शहरातील गणितप्रेमी मंडळींना एकत्र करून शुभंकरोती गणितप्रेमी मंडळाची स्थापना केली. १९९८ पासून डोंबिवलीत ते शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गणित शिकवित आहेत.गणित विषयाचे नीट आकलन व्हायचे असेल, तर तो आधी नीट समजून घ्यायला हवा, असे गोरे यांचे मत आहे. सध्या पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना ते गणिताची मैत्री करण्याबाबतचे खास प्रशिक्षण देतात. मराठी तसेच इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांतील विद्यार्थी या प्रशिक्षण वर्गाचा लाभ घेऊ शकतात. शाळा, खासगी शिकवणी वर्ग, सोसायटय़ांमध्ये हे वर्ग घेतले जातात. प्रवासखर्चा व्यतिरिक्त ते कोणतेही मानधन घेत नाहीत. पाचवी ते दहावीचे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना गणित शिकविण्याच्या पद्धतीविषयी सविस्तर माहिती देणारे उपयुक्त डोंबिवली पॅटर्न हे पुस्तकही त्यांनी लिहिले आहे. संपर्क-०२५१/२८८३५८३

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onगणितMaths
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dombivli pattern for make as friend to maths
First published on: 04-12-2012 at 11:48 IST