शरद पवार यांचे विश्वासू कार्यकर्ते अशी ओळख असणारे किसनराव जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला. ते १५ वष्रे औसा मतदारसंघाचे आमदार होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची साथ सोडून आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी शिवसेनेशी संगत केली आहे.
शरद पवारांचे विश्वासू कार्यकत्रे म्हणून किसनराव जाधव ओळखले जात. एस. काँग्रेसमधून पहिल्यांदा त्यांनी औशातून निवडणूक लढवली व विजय संपादन केला. त्यानंतर एस. काँग्रेस हा काँग्रेसमध्ये विलीन झाल्यामुळे त्यांनी काँग्रेसकडून सलग दोन वेळा निवडणूक लढवून विजय मिळविला. चौथ्यांदा मात्र शिवसेनेचे दिनकर माने यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर काँग्रेसमधून ते राष्ट्रवादीत गेले. राष्ट्रवादीतून पुन्हा काँग्रेसमध्ये आले व पुन्हा काँग्रेसमधून राष्ट्रवादीत गेले. राष्ट्रवादीत औसा तालुक्यात आपल्याला भवितव्य नाही हे लक्षात आल्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर आता शिवसेनेत प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादीत नव्यांना संधी दिली जाते व जुन्यांकडे दुर्लक्ष केले जाते, असा समज त्यांच्या कार्यकर्त्यांचा झाला असल्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे बोलले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former mla kisanrao jadhav to enter shivsena
First published on: 27-06-2013 at 01:40 IST