विलेपाल्र्यात १४ जानेवारीला ‘मी उद्योजक होणारच’

परिवर्तन एक बदल, कर्तव्य फाऊंडेशन आणि बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाच्या सहकार्याने ‘मी उद्योजक होणारच’चे चौथे पर्व १४ जानेवारीला आयोजित करण्यात आले आहे.

परिवर्तन एक बदल, कर्तव्य फाऊंडेशन आणि बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाच्या सहकार्याने ‘मी उद्योजक होणारच’चे चौथे पर्व १४ जानेवारीला आयोजित करण्यात आले आहे.  उद्योगामध्ये असलेल्या, त्यात यशस्वी होऊ इच्छिणाऱ्या किंवा नव्याने उद्योग व्यवसाय करू इच्छिणाऱ्या सर्वाना या कार्यक्रमाला उपस्थित राहता येईल. विलेपार्ले येथील नवीनभाई ठक्कर सभागृहात सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत हा कार्यक्रम होईल. उद्योजगतेविषयी आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम करण्यात येतो. निर्माण समूहाचे अध्यक्ष राजेंद्र सावंत, क्रिस्टल समूहाचे अध्यक्ष प्रसाद लाड, पितांबरी समूहाचे अध्यक्ष रवींद्र प्रभुदेसाई, डबेवाले डॉ. पवन अग्रवाल, ‘इंग्लीश बोल’चे अनिल कर्ता व डॉ. संतोष कामेरकर या कार्यक्रमामध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करतील. अभिनेत्री समीरा गुजर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क – अमेय अमरे – ९२२३२०८१४६, ९००४५६७२६४, हेमंत मोरे – ९७७३९२८५५९.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Fourth session of i will be entrepreneur held in vile parle