सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेरामेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष मेघराज मडेप्पा ऊर्फ अप्पासाहेब काडादी यांच्या पाíथवावर मंगळवारी दुपारी देगाव येथील काडादी फार्म हाऊसमध्ये शोकाकुल वातावरणात वीरशैव धर्माच्या पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी हजारोंचा जमाव उपस्थितीत होता.
काडादी यांचे काल सोमवारी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हृदयविकाराने निधन झाले होते. मध्यरात्री उशिरा त्यांचे पाíथव रेल्वे लाईन्स भागातील काडादी बंगल्यात (गंगा निवास) आणण्यात आले. महापौर अलका राठोड यांच्यासह शेकापचे ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख, औशाचे आमदार बसवराज पाटील, अक्कलकोटचे आमदार सिद्रामप्पा पाटील आदींनी दिवगंत मेघराज काडादी यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. आमदार दिलीप माने, आमदार विजय देशमुख, तुळजापूरचे माजी आमदार सिद्रामप्पा आलुरे गुरुजी, निर्मला ठोकळ, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, विश्वनाथ चाकोते, प्रकाश यलगुलवार, रविकांत पाटील, शिवशरण पाटील आदी मंडळी अंत्ययात्रेत सहभागी झाली होती. याशिवाय मंद्रूपचे श्री रेणुका शिवाचार्य महास्वामीजी, नागणसूरचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी यांच्यासह उद्योगपती शरदचंद्र ठाकरे, राम रेड्डी, वळसंगच्या स्वामी समर्थ सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष प्रशांत परिचारक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, वालचंद शिक्षण समूहाचे सचिव डॉ. रणजित गांधी यांचाही अंत्ययात्रेत सहभाग होता. काडादी यांचे पुतणे तथा सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांना अनेक मान्यवरांनी भेटून त्यांचे सांत्वन केले.
काडादी यांच्या निधनामुळे सिद्धेश्वर देवस्थान संचलित सर्व शिक्षण संस्था तसेच संगमेश्वर महाविद्यालयाचे कामकाज बंद ठेवण्यात आले होते. येत्या शुक्रवारी दुपारी चार वाजता सिद्धेश्वर मंदिरात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Funeral on meghraj kadadi in solapur
First published on: 04-09-2013 at 01:58 IST